Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू दमदार प्रदर्शन करून दाखवत आहेत.  या स्पर्धेतील चौथ्या दिवशीही भारतानं तीन पदकं जिंकली.  राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकतालिकेत भारत एकूण 9 पदकांसह सहाव्या क्रमांकावर आहे. याचदरम्यान भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. स्पर्धेदरम्यान भारतीय सायकलपटू मीनाक्षीला (Indian cyclist Meenakshi) अपघात झाला. या अपघातानंतर तिला स्ट्रेचरवर बसवून मैदानावर बाहेर काढण्यात आलं. 


नेमकं काय घडलं?
राष्ट्रकुल स्पर्धेतील महिलांच्या 10 किलो मीटरच्या सायकलिंग स्केच रन प्रकारात मीनाक्षी सायकलला अपघात झाला. स्पर्धेदरम्यान मीनाक्षी वळण घेताना तिची सायकल अडकली आणि ती खाली पडली. ज्यात ती जखमी झाली. एवढेच नव्हे तर, तिच्या पाठीमागून येणाऱ्या न्यूझीलंडच्या प्रतिस्पर्ध्याची ब्रायोनी बोथाची सायकल तिच्या अंगावरून गेली. यात ब्रायोनी बोथालाही दुखापत झालीय.


मैदानातील प्रेक्षकही पडले चिंतेत
या अपघातानंतर लगेचच तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मीनाक्षीच्या दिशेने धाव घेतली. तसेच मीनाक्षी आणि बोथाला मैदानातून बाहेर काढण्यात आलं. त्यांनी मीनाक्षीला तेथून स्ट्रेचरवर नेले. हा सगळा प्रकार पाहून मैदानातील प्रेक्षकही चिंतेत पडले. 


मीनाक्षीच्या अपघाताचा सोशल मीडियावर व्हायरल
मीनाक्षीच्या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्पर्धेदरम्यानचा हा दुसरा अपघात आहे. याआधी याआधी इंग्लंडचा मॅट वॉल्सही या स्पर्धेदरम्यान सायकलवरून खाली कोसळला होता. मीनाक्षी लवकरात लवकर दुखापतीवर मात करावी, अशी भारतीय क्रिडा चाहते प्राथना करत आहे. 


हे देखील वाचा-