Maharani Season 2 Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशीनं (Huma Qureshi) मोठ्या पडद्याबरोबरच ओटीटीवर देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. तिच्या 'महारानी' (Maharani) या सीरिजनं प्रेक्षकांची पसंती मिळवली. गेल्या वर्षी या सीरिजचा पहिला सिझन रिलीज झाला होता. आता या सीरिजचा आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. महारानी-2 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत, आता या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील हुमाच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सीरिजमध्ये राजकारण आणि क्राइम या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत, असं ट्रेलर पाहून कळत आहे. 


महारानी या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये रानी भारती या सर्वसामान्य गृहिणीचा राजकारणी होण्याचा प्रवास दाखवण्यात आला होता. आता या दुसऱ्या सिझनमध्ये रानी भारतीचा धाकड अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ट्रेलरमधील हुमाच्या 'ये नया बिहार है' या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले. 


पाहा ट्रेलर:



महारानी-2 या वेब सीरिजची निर्मिती कांगडा टॉकीज आणि रवींद्र गौतम यांनी केली आहे.  सुभाष कपूर आणि नंदन सिंह हे या सीरिजचे लेखक आहेत. या सीरिजमध्ये हुमा कुरेशीसोबतच  सोहम शाह (भीमा भारती), अमित सियाल (नवीन कुमार), विनीत कुमार (गौरी शंकर पांडे), इनामुलहक (परवेज आलम), कनी कस्तूरी (कावेरी श्रीधरन), अनुजा साठे (कृति सिंह), प्रमोद पाठक (मिश्रा)  आणि नेहा चौहान (कल्पना कौल) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'महारानी सिजन 2' प्रेक्षश्रक  सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकणार आहेत. ही सीरिज 25 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. 


हेही वाचा: 


Maharani 2 : 'महारानी 2'मध्ये मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठेची एंट्री, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!