Sourav Ghoshal : भारताचा दिग्गज स्क्वॉशपटू सौरव घोषाल (Sourav Ghoshal) यानं कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ग्रेग लोबानचा पराभव केला. या विजयासह त्यानं उपांत्य फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. तसेच, याआधी शनिवारी झालेल्या सामन्यात जोश्ना चिनप्पा आणि सौरव घोषाल यांनी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिला आणि पुरुष एकेरीच्या राउंड ऑफ 16 मध्ये सहज विजय मिळवला होता. 


सौरव घोषालचा धमाकेदार विजय


सौरव घोषालनं राउंड ऑफ 32 चा सामना 3-0 अशा बरोबरीच्या फरकानं जिंकला. त्याचवेळी जोश्नानं बार्बाडोसच्या मेगन बेस्टचा पराभव केला. विशेष म्हणजे, जोश्ना 18 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन बनली आहे. तिनं बार्बाडोसच्या मेगन बेस्टचा 11-8, 11-9, 12-10 असा पराभव केला. जोश्नानं पहिले 2 सेट सहज जिंकले. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये जोश्नाला कडवी झुंज मिळाली.


सौरव घोषाल उपांत्य फेरीत


भारताचा दिग्गज स्क्वॉशपटू 35 वर्षीय सौरव घोषालनं श्रीलंकेच्या शामिल वकिलाचा पराभव केला. त्यानं श्रीलंकेच्या खेळाडूचा 11-4, 11-4, 11-6 असा पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतर सौरव घोषालनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यानं ग्रेग लोबानचा पराभव केला आहे. बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून धमाकेदार कामगिरी सुरु आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी 9 पदकांची कमाई केली आहे. त्यापैकी दोन सुवर्ण पदकांचा समावेश आहे. अशातच आता स्क्वॉशमध्येही देशाला पदक मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंतची स्पर्धेतील धडाकेबाज कामगिरी पाहता सौरव घोषाल सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :