एक्स्प्लोर

Ronaldo vs Messi : पुन्हा एकदा रोनाल्डो-मेस्सी आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना? सर्व माहिती एका क्लिकवर

Ronaldo vs Messi Match : फुटबॉल जगतात सध्याच्या घडीचे दोन दिग्गज फुटबॉलपटू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी.या दोघांचा सामना म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते.

Football News : फुटबॉल फॅन्सनी नुकताच फिफा विश्वचषकाचा (Fifa World Cup 2022) थरार अनुभवला. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) कर्णधार असणाऱ्या अर्जेंटिना संघाने विश्वचषक जिंकला. पण तेव्हाच रोनाल्डो (Cristiano Ronaldo) कर्णधार असणारा पोर्तुगाल उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर गेल्यानं अनेक फुटबॉलप्रेमींची निराशाही झाली. पण आता हे दोन्ही दिग्गज म्हणजेच लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा मैदानात एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. सौदी अरेबियातील रियाध शहरात फुटबॉल विश्वातील या दोन दिग्गजांमध्ये टक्कर होणार आहे. मेस्सी असणाऱ्या पॅरिस सेंट जर्मन (PSG) फुटबॉल क्लब या आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान तो रियाद 11 विरुद्ध सामना खेळणार आहे. यावेळी रियाद 11 संघात सौदीतील दमदार खेळाडू मैदानात उतरतील. यांचं नेतृत्त्व रोनाल्डो करणार आहे. ज्यामुळे या सामन्यात हे रोनाल्डो-मेस्सी हे दोन्ही दिग्गज आमनेसामने असतील.

लिओनेल मेस्सी हा फ्रेंच फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेनकडून खेळतो. त्याच वेळी, रोनाल्डोने युरोपियन फुटबॉलसोडून सौदी अरेबियाच्या अल नसर क्लबमध्ये प्रवेश केला आहे. रियाद शहरातील अल नसर आणि अल हिलाल या क्लबमधील खेळाडू मिळून 'रियाद ST 11' या संयुक्त संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो पीएसजीविरुद्ध या संघाचे नेतृत्व करणार आहे.

तिकिटांसाठी 20 लाख जण प्रतिक्षेत

19 जानेवारी अर्थात गुरुवारी हा सामना रियाद येथे होणार आहे. या भव्य सामन्यासाठी ऑनलाइन 20 लाख तिकीट विनंत्या आल्या होत्या. या सामन्याच्या व्हीआयपी तिकिटांच्या (VIP Tickets) लिलावाची किंमत धक्कादायक होती. मंगळवारी झालेल्या लिलावात (Auction For Tickets) या सामन्याची VIP तिकिटं $2.66 दशलक्षमध्ये विकली गेली. रोनाल्डो आणि मेस्सी (Ronaldo and Messi) यांच्यात गेल्या दशकभरापासून सर्वोत्तम फुटबॉलपटू होण्यासाठी (Greates of All time) युद्ध सुरू आहे. हे दोन्ही खेळाडू आळीपाळीने बलॉन डी'ओर हा मानाचा पुरस्कार जिंकत आले आहेत. हे दोन्ही खेळाडू यापूर्वी स्पेनच्या ला लीगामध्ये एकमेंकाविरुद्ध खेळले होते, जिथे मेस्सीने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व केले होते आणि रोनाल्डोने रिअल माद्रिदचे प्रतिनिधित्व केले होते. अशा परिस्थितीत या दोन खेळाडूंनी एकमेकांविरुद्ध अनेक सामने खेळले आहेत. पण मागील बराच काळ ते आमने-सामने आले असून आता मात्र ते एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Video: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Fly Express Airlines Owner : अल हिंद एअर आणि फ्लाय एक्स्प्रेसला केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाकडून NOC, दोन्ही एअरलाईन्सचे मालक कोण?
अल हिंद एअर,फ्लाय एक्स्प्रेसला केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाकडून NOC, दोन्ही एअरलाईन्सचे मालक कोण?
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं
Nashik Election BJP: गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत मंत्र्यांकडून पक्षप्रवेश, VIDEO व्हायरल
Video गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत मंत्र्यांकडून पक्षप्रवेश, VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..
Navnath Ban Mumbai : सेना-मनसे ही युती नाही तर भीती आहे! ठाकरे बंधूंवर नवनाथ बन यांची टीका
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? महाडिक म्हणाले..
Jingle Bells In Goa | कसा असतो गोव्यातला Christmas ? गोव्यातल्या अफलातून सेलिब्रेशनचे रंग 'माझा'वर
Thackeray Brothers Alliance : युती भावाशी, लढाई 'देवा'शी; युती ठाकरेंची,तलवार मराठीची Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Video: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतेज पाटलांना अल्टिमेटम
Fly Express Airlines Owner : अल हिंद एअर आणि फ्लाय एक्स्प्रेसला केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाकडून NOC, दोन्ही एअरलाईन्सचे मालक कोण?
अल हिंद एअर,फ्लाय एक्स्प्रेसला केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाकडून NOC, दोन्ही एअरलाईन्सचे मालक कोण?
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं
Nashik Election BJP: गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत मंत्र्यांकडून पक्षप्रवेश, VIDEO व्हायरल
Video गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; विरोध झुगारत मंत्र्यांकडून पक्षप्रवेश, VIDEO व्हायरल
Tarique Rahman: तेव्हा देशातून फरार अन् आता तब्बल 17 वर्षांनी बांगलादेशात वापसी; 300 फुटी विमानतळावर स्वागताला लाखोंचा जमाव! येत्या निवडणुकीत थेट पीएम पदाचे दावेदार?
तेव्हा देशातून फरार अन् आता तब्बल 17 वर्षांनी बांगलादेशात वापसी; 300 फुटी विमानतळावर स्वागताला लाखोंचा जमाव! येत्या निवडणुकीत थेट पीएम पदाचे दावेदार?
Prashant Jagtap Pune: शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर? पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर? पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
देवयानी फरांदेंच्या विरोधाला किंमत नाही, नाशिक भाजपमध्ये माजी आमदारासह 5 बड्या नेत्यांचा प्रवेश
देवयानी फरांदेंच्या विरोधाला किंमत नाही, नाशिक भाजपमध्ये माजी आमदारासह 5 बड्या नेत्यांचा प्रवेश
Vaibhav Suryavanshi News : 70 सेकंदाच्या व्हिडिओत 14 वर्षांच्या पोराची हायव्होल्टेज खेळी, वैभवचा कहर पाहून थरूर भारावले! थेट गौतम गंभीरला केला मेसेज
70 सेकंदाच्या व्हिडिओत 14 वर्षांच्या पोराची हायव्होल्टेज खेळी, वैभवचा कहर पाहून थरूर भारावले! थेट गौतम गंभीरला केला मेसेज
Embed widget