एक्स्प्लोर
फलंदाजाचा जोराचा फटका, बॅट लागल्याने विकेट कीपरचा मृत्यू
कौशिक हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होता.

कोलकाता: क्रिकेटच्या मैदानातील जीवघेण्या दुखापतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
फटका मारणाऱ्या फलंदाजाची बॅट विकेटमागे असलेल्या कीपरच्या डोक्यात लागल्याने क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कल्याणी इथं ही धक्कादायक घटना घडली.
कौशिक आचार्य असं या दुर्दैवी 19 वर्षीय विकेट कीपरचं नाव आहे. तो पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचा रहिवाशी होता.
कौशिक हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होता. एका सराव सामन्यादरम्यान तो विकेटकिपिंग करत होता.
त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या खेळाडूने विकेटमागे जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचदरम्यान विकेट कीपर असलेल्या कौशिक आचार्यने तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, फलंदाजाने फिरवलेली बॅट, जोरात कौशिकच्या डोक्यात लागली.
या मारामुळे कौशिक जबर जखमी झाला. त्याच्या डोक्याला मार लागल्याने ते मृत्युमुखी पडला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
