IND vs WI: अजिंक्य रहाणे गेल्या 2 वर्षांतील कसोटी फॉरमॅटमधील सर्वात फ्लॉप फलंदाज; कोहलीचाही यादीत समावेश
Ajinkya Rahane Stats: अजिंक्य रहाणेनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दोन्ही इनिंग्समध्ये धमाकेदार खेळी केली. पण त्यानं एक नकोसा विक्रमही आपल्या नावे केला आहे.
Ajinkya Rahane Stats: टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेली काही वर्ष आपला फॉर्म गमावून बसलेला. पण आयपीएल 2023 च्या (IPL 2023) मोसमात चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) चमकदार कामगिरी करत त्यानं आपला फॉर्म पुन्हा दाखवून दिला. याच खेळीच्या जोरावर अजिंक्य रहाणेनं WTC साठीच्या कसोटी संघात टीम इंडियात पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये अजिंक्य रहाणेने पहिल्या इनिंगमध्ये 89 धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने 46 धावांची खेळी केली. या खेळाडूनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दोन्ही इनिंगमध्ये धावा केल्या. मात्र, आता अजिंक्य रहाणेची वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. टीम इंडियात आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी अजिंक्य रहाणेला वेस्ट इंडिजविरोधातही धमाकेदार फॉर्म दाखवणं गरजेचं आहे.
'या' फ्लॉप फलंदाजांच्या यादीत अजिंक्य रहाणे अव्वल
पण गेल्या काही वर्षांत फॉर्म गमावल्यामुळे अजिंक्य रहाणेनं आपल्या नावावर एक नकोसा विक्रम केला आहे. 2020 सालापासून अजिंक्य रहाणेची सरासरी कसोटी फॉरमॅटमधील टॉप-7 फलंदाजांमध्ये सर्वात वाईट आहे. अजिंक्य रहाणेनं 2020 पासून कसोटी फॉरमॅटमध्ये फक्त 26.50 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या नको असलेल्या यादीत इंग्लंडचा जॅक क्रॉउली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या जॅक क्रॉउलीनं 2020 नंतर कसोटी फॉरमॅटमध्ये 28.80 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. याशिवाय या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. 2020 नंतर विराट कोहलीनं कसोटी फॉरमॅटमध्ये 29.69 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.
टीम इंडियाची नजर वेस्ट इंडिज दौऱ्यावर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील WTC खेळलेल्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला, पण दोन्ही वेळा टीम इंडियाच्या पदरी निराशाच आली. त्याचबरोबर आता हा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघ यजमान वेस्ट इंडिजसोबत कसोटी सामन्यांव्यतिरिक्त एकदिवसीय आणि टी-20 मालिकाही खेळणार आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
अजिंक्य रहाणेचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्स
• 82 कसोट्या, 4931 धावा, 38.52 सरासरी
• 90 वनडे, 2962 धावा, 35.26 सरासरी
• 20 टी-20, 375 धावा, 20.83 सरासरी
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.