ED Summoned Yuvraj Singh: माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला ईडीचे समन्स; 23 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश, नेमकं प्रकरण काय?
ED Summoned Yuvraj Singh: याआधी भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सुरेश रैना, शिखर धवन, हरभजन सिंग यांचीही बेकायदेशीर बेटिंग अॅपप्रकरणी ईडीने चौकशी केली आहे.

ED Summoned Yuvraj Singh: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याला ईडीने समन्स बजावले आहे. बेकायदेशीर बेटिंग अॅप 1xBet प्रकरणात (ED Summoned Yuvraj Singh) ईडीने युवराज सिंगला 23 सप्टेंबर रोजी दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सुरेश रैना, शिखर धवन, हरभजन सिंग यांचीही बेकायदेशीर बेटिंग अॅपप्रकरणी ईडीने चौकशी केली आहे.
The Enforcement Directorate has summoned former cricketer Yuvraj Singh to appear before it for questioning at its headquarters in Delhi on September 23 in connection with illegal betting app 1xBet case: Officials
— ANI (@ANI) September 16, 2025
(file pic) pic.twitter.com/IHdYjmMl6G
ईडीने यापूर्वी शिखर धवन आणि सुरेश रैना यांनाही हजर राहावे लागले होते. या अॅपच्या जाहिरातीसंदर्भात धवन आणि रैना यांना बोलावण्यात आले होते. ईडीला हे जाणून घ्यायचे आहे की त्यांनी या अॅपची जाहिरात का केली, त्यासाठी त्यांना किती पैसे मिळाले आणि अॅपशी त्यांचा काय संबंध होता. आता युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांचीही याच प्रकरणात चौकशी केली जाईल.
नेमकं प्रकरण काय?
बेटिंग अॅप प्रकरणात शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्यानंतर ईडीने माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनाही समन्स बजावले आहेत. हे दोन्ही क्रिकेटपटू 23 सप्टेंबर रोजी ईडीसमोर हजर राहणार आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. हे प्रकरण सहारा ग्रुपच्या महाराष्ट्रातील अँबी व्हॅली प्रकल्पाशी संबंधित 300 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. अहवालानुसार, युवराज आणि उथप्पाने अँबी व्हॅलीमध्ये खरेदी केली. ही खरेदी अँबी व्हॅली ग्रुपच्या गुंतवणूक कार्यक्रमाचा भाग होती.
ईडीकडून सध्या अनेक बेकायदेशीर बेटिंग अॅप्सची चौकशी-
ईडी सध्या अनेक बेकायदेशीर बेटिंग ॲप्सची चौकशी करत आहे. या ॲप्सने अनेक लोकांना आणि गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा किंवा मोठ्या प्रमाणात करचोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आल्याने ईडीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.




















