Year Ender : टेस्ट, वनडेसह टी20 इंटरनेशनल...कोणत्या फॉर्मेटमध्ये कोणत्या भारतीय बॅट्समनचा दबदबा?
Year Ender 2022: यंदाच्या वर्षभरात भारतीय संघानं बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले असून कोणकोणत्या फलंदाजांने दमदार कामगिरी केली आहे, याबद्दल जाणून घेऊ...
Year Ender 2022 : भारतीय संघानं (Team India) 2022 वर्षभरात संमिश्र अशी कामगिरी केली आहे. भारत विश्वचषकासारखी (T20 World Cup 2022) मोठी स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरला असला तरी मालिकांमध्ये मात्र भारतानं चांगली कामगिरी केली आहे. 2022 वर्षात भारतानं प्रथम आशिया कप, नंतर टी-20 विश्वचषक गमावला. तसंच वर्षभरात आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने, 24 एकदिवसीय सामने आणि 40 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने भारताने खेळले आहेत. तर या सर्वांमध्ये कोणत्या भारतीय फलंदाजाने आतापर्यंत कोणत्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसंच तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोण हे सारं जाणून घेऊ....
1. टेस्ट क्रिकेट (ऋषभ पंत)
भारतीय संघाने या वर्षात आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने (Test Matches) खेळले आहेत. ऋषभ पंत (Rishabh Pant) सर्व सामन्यांमध्ये संघाचा भाग होता. पंतने आतापर्यंत 6 सामन्यांच्या 10 डावात 64.22 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. त्याच्या या इनिंगमध्ये 2 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 91.60 राहिला आहे.
2. एकदिवसीय क्रिकेट (श्रेयस अय्यर)
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यंदा भारतीय संघासाठी सर्व फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट लयीत दिसला आहे. खासकरुन एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) तो कमाल कामगिरी करताना दिसला. अय्यरने 2022 मध्ये भारतीय संघासाठी एकूण 17 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 15 डावांमध्ये त्याने 55.69 च्या सरासरीने 724 धावा केल्या आहेत. त्याच्या खेळीत एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी त्याचा स्ट्राइक रेट 91.52 राहिला आहे.
3.टी20 क्रिकेट (सूर्यकुमार यादव)
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20 Cricket) वर्चस्व गाजवत आहे. सध्याच्या आयसीसी टी20 क्रमवारीत ( ICC T20 Ranking) तो पहिल्या क्रमांकावर आहे. सूर्याने यावर्षी भारतीय संघासाठी 31 सामन्यांच्या 31 डावांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा केल्या आहेत. त्यानं वर्षभरात 2 शतकं आणि 9 अर्धशतकं ठोकली आहेत.
हे देखील वाचा-