एक्स्प्लोर

Yashasvi Jaiswal : लोकांनी रनआऊट साठी कॅप्टन शुभमन गिलला कारणीभूत ठरवलं, आता यशस्वी जयस्वाल समोर येत म्हणाला...

Yashasvi Jaiswal : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत यशस्वी जयस्वाल 175 धावांवर बाद झाला. यावर त्यानं प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसरा दिवसाचा खेळं संपेपर्यंत भारतानं सामन्यावर वर्चस्व मिळवलं आहे. वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात 4 बाद 140 धावा केल्या आहेत. दुसरीकडे भारतानं पहिला डाव 5 बाद 518 धावांवर जाहीर केला. 2 बाद 318 वरुन भारतानं फलंदाजी सुरु करताच यशस्वी जयस्वाल 175 धावांवर धावबाद झाला. विकेट गेल्यानंतर यशस्वी जयस्वाल नाराज दिसून आला. तो बाद झाल्यानंतर काहीतरी बोलत असल्याचं दिसून आलं. या संपूर्ण प्रकरणावर यशस्वी जयस्वालनं प्रतिक्रिया दिली आहे.

यशस्वी जयस्वालनं 173 धावांवरुन पुढं खेळण्यास सुरुवात केली. आज 2 धावा केल्यानंतर जयस्वाल धावबाद झाला. जयस्वालनं मिड ऑफकडे बॉल मारला आणि धावत सुटला. शुभमन गिलनं धाव घेण्यास नकार दिला. यामुळं जयस्वाल परत क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही. यामुळं तो धावबाद झाला. सोशल मीडियावर काही जणांनी शुभमन गिलला तर काही जणांनी यशस्वी जयस्वालला जबाबदार धरलं आहे. आता यशस्वी जयस्वालनं या रनआऊटवर प्रतिक्रिया दिली आहे.

मी नेहमीच मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करतो, मी जर मैदानावर असेल तर स्कोअरबोर्ड पुढं गेला पाहिजे. रनआऊट खेळाचा भाग आहे, त्याबद्दल काही वाटत नाही. डोक्यात एकच असतं की मी काय मिळवू शकतो आणि माझ्या टीमचं ध्येय काय आहे, असं यशस्वी जयस्वाल म्हणाला.

यशस्वी जयस्वाल पुढं म्हणाला की मी जर एक तास पिचवर असेन तर त्यानंतर धावा करणं सोपं जात. दुर्दैवानं तो दुसऱ्या दिवशी काही मिनिटं पिचवर राहू शकला. यशस्वी जयस्वाल 175 धावांवर बाद झाला.

भारताच्या डाव्याच्या 92 व्या ओव्हरमध्ये जेडन सील्स गोलंदाजी करत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर जयस्वालनं मिड ऑफच्या दिशेनं बॉल मारला. यानंतर जयस्वालनं धाव घेण्यासाठी क्रीज सोडलं. जयस्वाल अर्ध्याहून अधिक अंतर पार करुन आला होता. मात्र, शुभमन गिलं क्रीज सोडलेलं नव्हतं. टॅगनरीन चंदरपॉल यानं थेट थ्रो विकेटकीपर टेविन इमलाच याच्या दिशेन केला आणि जयस्वाल रन आऊट झाला.

दरम्यान, भारतानं 5 बाद 518 धावांवर पहिला डाव घोषित केला. शुभमन गिलनं नाबाद 129 धावा केल्या.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: '…या प्रकरणी कारवाई केली जाईल', पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांचा इशारा
Parth Pawar Land Scam:: रद्द केला व्यवहार, वाचणार पार्थ पवार? Special Report
Lonar Lake : लोणारच्या खाऱ्या पाण्यात चक्क मासे, पर्यावरणाला मोठा धोका Special Report
Manoj Jarange vs Dhananjay Munde : जरांगेंच्या हत्येचा कट? कोण जानी दुश्मन? Special Report
Devendra Fadnavis : जमीन व्यवहार प्रकणात कुणालाही सोडणार नाही,दोषींवर कारवाई होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Embed widget