Yashasvi Jaiswal Ind vs Eng 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवलाय. यशस्वीचा द्वशतकी तडाखा आणि रवींद्र जाडेजाच्या फिरकीच्या जादूच्या जोरावर भारताने इंग्लंडला 434 धावांनी मात दिली. दरम्यान, यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीनंतर नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने वसीम आक्रमच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रोहित-विराटला जे जमलं नाही ते यशस्वी जैस्वालने करुन दाखवलय. यशस्वीने इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेस्स अँडरसनला सलग तीन षटकार लगावले. सोबतच त्याने एका डावात तब्बल 12 षटकार लगावले आहेत. 


वसीम आक्रमच्या विक्रमाशी बरोबरी  


यशस्वी जैस्वालने वसीम आक्रमशी बरोबरी केली आहे. वसीम आक्रमने टेस्ट क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आहे. तो विक्रम आजवर कोणालाही मोडता आलेला नाही.  झिम्बाब्वेविरोधात 1996 मध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात वसीम आक्रमने एका डावात 12 षटकार लगावले होते. आजवर कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नव्हती. मात्र, यशस्वी जैस्वालने एकाच डावात 12 षटकार लगावत वसीम आक्रमशी बरोबरी केली आहे.


रोहित-विराटलाही जमलं नाही, यशस्वीने करुन दाखवलं


यशस्वी जैस्वाल आणि वसीम आक्रम यांच्याशिवाय आजवर कोणालाही कसोटीतील एका डावात 12 षटकार लगावता आलेले नाहीत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांनाही हा पराक्रम करता आलेला नाही. तो नवख्या आणि युवा यशस्वी जैस्वालने करुन दाखवलाय. ब्रेंडम मॅकालम, मॅथ्यू हेडन, कुसल मेंडिस, बेन स्टोक्स, नेथन लायन, यांसारख्या दिग्गजांना आजवर 11 षटकार लगावण्यात यश आलं होतं. मात्र, वसीम आक्रम यांचा विक्रम एका षटकाराने लांबच राहिला होता. आता मात्र, यशस्वीने या विक्रमाशी बरोबरी केली.
 






यशस्वीच्या तडाख्याने इंग्लंडची धुळदाण


भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 236 चेंडूत 12 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 214 धावा केल्या. यशस्वीच्या खेळीमुळे भारताकडे 556 धावांची आघाडी घेतली. यशस्वीच्या खेळीमुळे इंग्रजांची धुळदाण झाली. जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानल्या जाणाऱ्या जेम्स अँडरसनची त्याने सलग तीन षटकार लगावत धुलाई केली होती. त्यामुळे इंग्लंडला 557 धावांच्या विशाला लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. टीम इंडियाच्या 557 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 122 धावांवर ढेपाळला. 






इतर महत्वाच्या बातम्या 


IND vs ENG 3rd Test : इंग्रजांच्या छाताडावर नाचत टीम इंडियाचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय!