Sarfaraz Khan : टीम इंडियाचा युवा फलंदाज सर्फराज खानने राजकोटमध्ये कसोटी पदार्पण केले. सरफराज खानने पहिल्या डावात 62 धावांची शानदार खेळी केली. यानंतर तो दुसऱ्या डावात 72 चेंडूत 68 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले. सरफराज खानने शानदार शैलीत पदार्पण केले. तसेच, त्याने भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांच्या विशेष यादीत स्थान मिळवले आहे.






या खास यादीत सर्फराज खानने स्थान मिळवले 


सरफराज खानने कसोटी पदार्पणाच्या दोन्ही डावांत पन्नासहून अधिक धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो केवळ चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत दिलवर हुसेन पहिल्या क्रमांकावर आहे. दिलवर हुसेनने पदार्पणाच्या कसोटीतच ही कामगिरी केली होती. यानंतर सुनील गावसकर यांनी पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात पन्नासहून अधिक धावा केल्या. त्याच वेळी, श्रेयस अय्यर हा तिसरा भारतीय फलंदाज आहे, ज्याने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात पन्नास धावांचा आकडा पार केला. आता या यादीत सरफराज खानचा समावेश झाला आहे.






राजकोट कसोटीत ब्रिटिशांचा पराभव निश्चित!


राजकोट कसोटीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने 4 बाद 430 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. भारताकडून यशस्वी जैस्वालने 214 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय शुभमन गिलने 91 धावा केल्या. तर सर्फराज खान ६८ धावा करून नाबाद परतला. पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय संघाला 126 धावांची आघाडी मिळाली होती. अशाप्रकारे इंग्रजांना 557 धावांचे लक्ष्य दिलं होतं, पण इंग्लंडचा डाव अवघ्या 122 धावांमध्ये गुंडाळला गेला. 


इतर महत्वाच्या बातम्या