South Africa VS Australia World Test Championship Final : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारतीय संघाला 1-3 ने पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही संघांमधील या मालिकेतील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. टीम इंडियाला ही मालिका बरोबरीत संपवण्यासाठी कोणत्याही किंमतीवर हा सामना जिंकावा लागणार होता, पण अवघ्या तीन दिवसांतच टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवरही परिणाम झाला आहे. आता फायनलमध्ये पोहोचण्याच्या टीम इंडियाच्या सर्व आशा पल्लवित झाल्या आहेत.






भारत WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर


भारत आता 2023-25 ​​वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला ही मालिका कोणत्याही परिस्थितीत बरोबरीत संपवाची होती. मात्र ती तसे करण्यात अपयशी ठरली. म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा टीम इंडियाशिवाय अंतिम सामना खेळवला जाईल. याआधी दोन्ही वेळा भारतीय संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. पण यावेळी टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये विशेष काही करता आले नाही. भारताने ऑस्ट्रेलिया बरोबरच नाही तर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिकाही गमावली.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​मध्ये भारताची कामगिरी


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​ची सुरुवात टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने केली होती. भारतीय संघाने ही मालिका 1-0 ने जिंकली. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेली 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. यानंतर टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी झाला. टीम इंडियाने ही मालिका 4-1 ने जिंकली. यानंतर 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतही बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला. मात्र त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही पराभव पत्करावा लागला.


ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकामध्ये रंगणार अंतिम सामना  


टीम इंडियाच्या बाहेर पडल्याने आता हे देखील निश्चित झाले आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेने आधीच फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले होते आणि आता ऑस्ट्रेलियानेही फायनलसाठी पात्रता मिळवली आहे. 


हे ही वाचा -


Virat Kohli : कोहलीची ऑस्ट्रेलियात लाजिरवाणी कामगिरी; BCCI 'विराट' निर्णय घेण्याच्या तयारीत; लवकरच बोलवणार बैठक