Australia Needs 162 Runs To win Sydney Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनीमध्ये खेळली जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ जास्त काळ टिकू शकला नाही. फक्त अर्ध्या तासात ऑस्ट्रेलियाने लवकरच पाहुण्यांचा 4 विकेट्स घेत ऑलआऊट केले. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 157 धावा केल्या असून आता ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 162 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने आपल्या स्कोअरमध्ये फक्त 16 धावांची भर घातली. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने 6 विकेट घेतल्या.
भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी 141/6 पासून खेळण्याची सुरूवात केली. पॅट कमिन्सने दिवसाच्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रवींद्र जडेजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर 39व्या षटकात कमिन्सने भारताला पुढचा धक्का दिला. त्याने वॉशिंग्टन सुंदरची विकेट घेतली. यानंतर मोहम्मद सिराज आणि कर्णधार जसप्रीत बुमराहच्या विकेट स्कॉट बोलंडच्या खात्यात गेल्या. भारताच्या पहिल्या डावात 22 धावा करणाऱ्या बुमराहला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही.
स्कॉट बोलंडचा विकेटचा षटकार
भारताच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासाठी बोलंड हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 16.5 षटकात 45 धावा देत 6 बळी घेतले. त्याने यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना आपले शिकार बनवले. पहिल्या डावात 4 विकेट घेण्यात बोलंडला यश आले होते. अशा प्रकारे त्याने सामन्यात एकूण 10 विकेट घेतल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करणे ऑस्ट्रेलियासाठी फारसे अवघड जाणार नाही. त्याची फलंदाजी खूप मजबूत आहे. ही कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियन संघ ही मालिका 3-1 ने जिंकेल. खराब फलंदाजीमुळे टीम इंडिया ही मालिका गमावणार आहे.
हे ही वाचा -