World Test Championship 2023-25 Points Table : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यातच श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव करून इंग्लंडने भारतासह अनेक संघाची डोकेदुखी वाढली आहे.


इंग्लंड संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेत मोठे फेरबदल केले आहेत. या विजयासह संघाने गुणतालिकेत 2 स्थानांवर झेप घेतली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशाही वाढल्या आहेत.


इंग्लंडने घेतली मोठी झेप


श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर होता. या सामन्यात इंग्लंडने पाच गडी राखून विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर गेला आहे. इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धची दुसरी कसोटी जिंकल्यास त्याचे रँकिंग आणखी मजबूत होईल. इंग्लंडच्या विजयामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे प्रत्येकी 1 स्थान खाली आले आहे.


चौथ्या क्रमांकावर असलेला श्रीलंकेचा संघ पाचव्या स्थानावर तर दक्षिण आफ्रिका 6 सामन्यात 2 विजय, 3 पराभव आणि 1 ड्रॉसह सहाव्या स्थानावर आहे. पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान 5 सामन्यात 2 विजय आणि 3 पराभवांसह सातव्या स्थानावर आहे. बांगलादेश आठव्या आणि वेस्ट इंडिज नवव्या स्थानावर आहे.


टॉप-5 मध्ये कोण?


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अजूनही पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या आणि श्रीलंका पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंड टॉप-पाच मध्ये आल्याने अंतिम फेरीची शर्यत आणखी कठीण झाली आहे. आता टॉप-5मधील संघांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.



हे ही वाचा :


IPL 2025 : KKR श्रेयस अय्यरकडून कर्णधारपद घेणार काढून? मुंबई इंडियन्सच्या मराठमोळ्या पठ्ठ्याला दिली कर्णधारपदाची ऑफर

Suryakumar Yadav IPL 2025 : मुंबई इंडियन्सला खिंडार पडणार, सूर्यकुमार यादव टीम इंडियानंतर 'या' संघाचं करणार नेतृत्त्व?


Shaheen Afridi Baby Boy : आफ्रिदीच्या घरात हलला पाळणा, लेकाचा जन्म, पाकिस्तान-बांगलादेश कसोटी सुरु असताना मिळाली गोड बातमी