Suryakumar Yadav IPL 2025 : मुंबई इंडियन्सला खिंडार पडणार, सूर्यकुमार यादव टीम इंडियानंतर 'या' संघाचं करणार नेतृत्त्व?
आयपीएल 2024 मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कारण आयपीएल 2025 मेगा लिलाव होणार आहे, त्यामुळे अनेक खेळाडूंचे संघ बदलले जाऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार केकेआरने सूर्यकुमार यादवला कर्णधारपदाची अनधिकृत ऑफर दिली आहे. सूर्याने मुंबई सोडल्यास तो केकेआरमध्ये जाऊ शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
सूर्या 2018 पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. सूर्याला 2018 ते 2021 पर्यंत 3.20 कोटी रुपये पगार मिळत होता. त्यानंतर 2022 मध्ये पगार वाढवण्यात आला. आता त्याला आठ कोटी रुपये मिळतात. मात्र आता मेगा लिलावापूर्वी मुंबईने त्यांना सोडले तर कोलकाता त्यांना खरेदी करू शकेल.
स्पोर्ट्सकीडाने दिलेल्या वृत्तानुसार, केकेआरने सूर्याला कर्णधारपदाची ऑफर दिली आहे. मात्र त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सूर्या केकेआरमध्ये गेला तर तो कर्णधार होऊ शकतो. सूर्या आता सध्या टीम इंडियाचा टी-20 कर्णधार आहे.
गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले आणि पांड्याकडे कर्णधारपद सोपवले. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यासह अनेक खेळाडू पांड्याच्या कर्णधारपदावर खूश नव्हते.
पांड्याची कर्णधारपदाची शैली खेळाडूंना आवडली नाही. यामुळे रोहितही नाराज होता. मात्र, मुंबई कोणाला सोडते आणि कोणाला नाही हे अद्याप सांगता येणार नाही.
सूर्याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. तो एक स्फोटक फलंदाज आहे. सूर्याने 2023 मध्ये 16 सामन्यात 605 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतके झळकावली.
सूर्याने आतापर्यंत आयपीएलचे 150 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 3594 धावा केल्या आहेत. सूर्याने या लीगमध्ये 2 शतके आणि 24 अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे त्याला कर्णधारपदाचा अनुभवही आला आहे. सूर्याने टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.