IPL 2025 KKR : आयपीएल 2025 साठी फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. अनेक संघ आपले कर्णधार बदलणार आहेत. या यादीत कोलकाता नाईट रायडर्सचे नावही सामील झाले आहे. केकेआरने कर्णधारपदासाठी आणखी एका क्रिकेटपटूशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. आता जर त्या क्रिकेटपटूने ही ऑफर स्वीकारली तर केकेआरची कमान श्रेयस अय्यरकडून काढून घेतली जाऊ शकते.


श्रेयस अय्यरकडून कर्णधारपद घेणार काढून?


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2023 मध्ये विजेतेपद पटकावले होते. पण, असे असतानाही त्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार कायम आहे. खरं तर, आयपीएल 2023 मध्ये केकेआरच्या विजेतेपदाचे श्रेय पूर्णपणे गौतम गंभीरला देण्यात आले होते. गंभीर डगआऊटमधून बसून संपूर्ण संघ चालवत होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर केवळ मैदानावरील कर्णधार होता.


आता आयपीएल 2025 पूर्वी केकेआर अशा कर्णधाराच्या शोधात आहे, ज्याच्याकडे मैदानावर कठीण निर्णय घेऊन संघाला पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकून देण्याची ताकद असेल. श्रेयस अय्यरच्या आकडेवारीबद्दल सांगायचे तर, त्याने 115 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 127.48 च्या स्ट्राइक रेटने आणि 32.24 च्या सरासरीने 3127 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 21 अर्धशतकेही झळकावली आहेत.


सूर्यकुमार यादव होणार कर्णधार?


एका अहवालानुसार, आयपीएल 2025 पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सने सूर्यकुमार यादवला कर्णधारपदाची ऑफर दिली आहे. सूर्याने मुंबई सोडल्यास तो केकेआरमध्ये जाऊ शकतो. मात्र, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये जेव्हा रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवले होते, तेव्हा टीममधील अनेक गोष्टी बिघडू लागल्या होत्या. मुंबईच्या ताफ्यात दोन गट झाल्याचे दिसून आले. परिणामी, मुंबई आयपीएल 2024 मध्ये पॉइंट टेबलमध्ये दहाव्या स्थानावर राहिली. आता सूर्या व्यतिरिक्त माजी कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह देखील संघ सोडू शकतात अशी बातमी आहे.


हे ही वाचा :


Suryakumar Yadav IPL 2025 : मुंबई इंडियन्सला खिंडार पडणार, सूर्यकुमार यादव टीम इंडियानंतर 'या' संघाचं करणार नेतृत्त्व?


Shaheen Afridi Baby Boy : आफ्रिदीच्या घरात हलला पाळणा, लेकाचा जन्म, पाकिस्तान-बांगलादेश कसोटी सुरु असताना मिळाली गोड बातमी