IPL 2022 : भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार पद सोडल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) नुकतेच आयपीएलमधील रॉयल चॅलंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला आहे. कोहलीच्या या निर्यानंतर त्याचे चाहते कोहलीने हा निर्णय का घेतला हे जाणून घेण्यासाठी बेचैन आहेत. विराट कोहलीनेच आता याबाबत खुलासा केला आहे. त्याने रॉयल चॅलंजर्स बंगळुरूच्या कर्णधार पदाचा राजीनामा का दिला? याबाबत त्याने खुलासा केला आहे. 


‘द आरसीबी पॉडकॉस्ट’वर विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत सांगितले आहे. तो म्हणातो की, अनेक लोक काही गोष्टी धरून ठेवत असतात, परंतु, मी अशा लोकांपैकी नाही. मला माहित आहे की, मी खूप काही करू शकतो. परंतु, मला काही गोष्टींचा आनंद मिळत नसेल तर मी ते काम करणार नाही. " 


"एखादा क्रिकेटर असा निर्णय घेताना तो कोणता विचार करून निर्णय घेतो, हे लोकांना समजणे कठिण असते. लोक तुमच्या ठिकाणी असल्याशिवाय तुमचा निर्णय समजून घेणे फार कठीण आहे. लोकांच्या स्वतःच्या अपेक्षा असतात. एखाद्या क्रिकेटरने असा निर्णय घेतला तर, लोक म्हणतात अरे हे कसं झालं? आम्हाला धक्काच बसला, असे विराट म्हणतो. 


लोकांच्या या प्रतिक्रियांवर विराट म्हणतो की, मी कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला तर लोकांनी आश्चर्य वाटून घेण्यासारखे काही नाही. कारण मलाही माझ्यासाठी थोडा वेळ पाहिजे. शिवाय मला वर्कलोड मॅनेजमेंट हवे होते. त्यामुळे हे प्रकरण तिथेच संपते.
दरम्यान, आरसीबीला आतापर्यंत आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. परंतु, कोहलीने कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. " मी माझे जीवन अतिशय साधेपणाने जगतो. मला निर्णय घ्यावा लागतो त्यावेळी मी तो घेतो आणि जाहीर करतो, असे कोहलीने सांगितले आहे. 


विराट कोहलीने 2021 च्या T20 विश्वचषकापूर्वीच घोषणा केली होती की तो स्पर्धेनंतर या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार आहे. यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याचीही घोषणा केली. त्यामुळे तो सध्या फक्त आपल्या फॉर्मवर लक्ष केंद्रीत करत आहे.  


महत्वाच्या बातम्या