WPL 2023 :  महिला प्रीमियर लीग (WPL) चा पहिला हंगाम यंदा खेळवला जात असून नुकताच यासाठीचा लीलाव पार पडला. या लिलावात (Womens IPL Auction 2023) एकूण 87 खेळाडूंचं नशिब उघडलं. भारतीय खेळाडूंचंच येथे वर्चस्व दिसून आलं. कारण भारतातून किमान 45 खेळाडू निवडले जाण्याची खात्री होती. विशेष म्हणजे या लिलावात एकूण 57 भारतीय महिला खेळाडूंना खरेदी करण्यात आलं. भारतीय खेळाडूंनंतर या ठिकाणी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं वर्चस्व दिसून आलं. महिला प्रीमियर लीगच्या या लिलावात कमीत कमी 75 आणि जास्तीत जास्त 90 खेळाडूंना खरेदी करता येणार होतं. प्रत्येक फ्रँचायझीला 15 ते 18 खेळाडूंचा संघ ठेवण्याचा पर्याय होता. येथे जास्तीत जास्त 30 परदेशी खेळाडू खरेदी करता येणार होते. प्रत्येक फ्रँचायझीला संघात जास्तीत जास्त 6 परदेशी खेळाडूंचा समावेश करण्याचा पर्याय होता. पाचही फ्रँचायझींनी हा कोटा पूर्ण केला. ज्यामुळे लिलावात एखूण 30 विदेशी खेळाडूंना खरेदी करण्यात आलं.


कोणत्या देशाच्या किती खेळाडूंना मिळाला संघ?


सर्वाधिक 14 खेळाडू ऑस्ट्रेलिया संघाने खरेदी केले. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडचा नंबर लागतो. इंग्लंडच्या 7 खेळाडूंमध्ये विविध संघानी रस दाखवला. या दोन देशांनंतर दक्षिण आफ्रिकेतील 4, न्यूझीलंडचे 2, वेस्ट इंडिजचे 2 आणि अमेरिकेतील एका खेळाडूवर बोली लागली.


कोणाला मिळाले किती पैसे?


ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंवर या लिलावात पैशांचा पाऊस पडला. फ्रँचायझींनी 14 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 14.25 कोटी रुपये खर्च केले. त्याचवेळी इंग्लंडच्या 7 खेळाडूंवर 7.35 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. त्या तुलनेत भारतीय खेळाडूंना सरासरीने कमी पैसे मिळाले. भारताच्या 57 खेळाडूंवर एकूण 32.2 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या 4 खेळाडूंनी 3.1 कोटी, न्यूझीलंडच्या 2 खेळाडूंनी 1.5 कोटी, वेस्ट इंडिजच्या 2 खेळाडूंनी 1 कोटी आणि अमेरिकेच्या एका खेळाडूसाठी 10 लाख रुपये खर्च करण्यात आले.


ऑस्ट्रेलियाच्या 'या' 5 खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस


1. अॅश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलियन अष्टपैलू): 3.20 कोटी रुपये (गुजरात जायंट्स)
2. बेथ मुनी (ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक फलंदाज):  2 कोटी रुपये (गुजरात जायंट्स)
3. एलिस पेरी (ऑस्ट्रेलियन अष्टपैलू):  1.70 कोटी रुपये (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
4. ताहिला मॅकग्रा (ऑस्ट्रेलियन अष्टपैलू): 1.40 कोटी रुपये (UP वॉरियर्स)
5. मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलियन फलंदाज): रु. 1.10 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)


कुणी किती रुपयाला खरेदी केला संघ ? 


महिला प्रीमियर लीगमधील पाच संघासाठी लिलाव काही दिवसांपूर्वी पार पडला. अहमदाबाद संघाला सर्वाधिक बोली लागली होती. अदानी स्पोर्ट्स लाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अहमदाबाद संघाला 1289 कोटी रुपयांत खरेदी केलं. इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबई संघाला 912.99 कोटी रुपयांत खरेदी केलं. महिला आयपीएलमधील तिसऱ्या संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने खरेदी केलं. आरसीबीने बंगलोरसाठी 901 कोटी रुपये मोजलेत. तर दिल्लीच्या संघाला जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 810 कोटी रुपयांत खरेदी केलं. कापरी ग्लोबल होल्डिंग्स यांनी लखनौच्या महिला संघासाठी 757 कोटी रुपये मोजले आहेत. वुमन्स प्रीमियर लीगमधील पाचही संघाची एकूण किंमत 4669.99 कोटी रुपये इतकी झाली आहे. 


हे देखील वाचा-