WPL Auction, Unsold Players : महिला आयपीएलचा सध्या लिलाव सुरू असून अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली आहे. स्मृती मानधना, हरमनप्रीत, शफाली वर्मा या भारतीय खेळाडूंसह अनेक विदेशी खेळाडू मालामाल झाले आहेत. फ्रँचायझींनी खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोलीही लावली आहे. पण या लिलावात काही खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. यामध्ये काही भारतीय दिग्गज खेळाडूंसह विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. तानिया भाटिया, चमारी अट्टापट्टू आणि वर्ल्ड लेग बेस्ट लेग स्पिनर अलाना किंग यासारख्या महिला खेळाडूंवर कोणत्याच फ्रँचायझींनी बोली लावली नाही. पाहूयात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडू कोण कोण आहेत..
अलाना किंग आणि अट्टापट्टू राहिले अनसोल्ड
ऑस्ट्रेलियाची स्टार स्पिनर आणि सध्याची अव्वल महिला फिरकीपटू अलाना किंग हिच्यावर लिलावात कोणत्याही फ्रँचायझींनी बोली लावली नाही. ती अनसोल्ड राहिली आहे. लिलावापूर्वी अलाना किंग हिच्यावर कोट्यवधींची बोली लावली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात होता. पण लिलावात तिला खरेदीदार मिळाला नाही.
अलाना किंग हिच्याशिवाय श्रीलंकेची अनुभवी विस्फोटक फलंदाज चमारी अट्टापट्टू हिलाही कोणी खरेदीदार मिळाला नाही. जगातील सर्वोत्कृष्ट टी 20 फलंदाजामध्ये चमारीचं नाव घेतलं जात. पण लिलावात तिच्यावर बोली लागली नाही. त्याशिवाय तानिया भाटिया या दिग्गज भारतीय खेळाडूवरही बोली लागली नाही. ती अनसोल्ड राहिली..
अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंची यादी -
हेले मॅथ्यूज – वेस्ट इंडीज
सूजी बेट्स – न्यूझीलंड
तजमिन ब्रिट्स – दक्षिण आफ्रिका
लौरा वोल्वावार्ड्ट – दक्षिण अफ्रिका
टॅमी ब्यूमोंट – इंग्लंड
हीदर नाइट – इंग्लंड
फ्रॉन जोनास – न्यूझीलंड
एफी फ्लेचर – वेस्ट इंडीज
अलाना किंग – ऑस्ट्रेलिया
इनोका रानावेरा- श्रीलंका
पूनम यादव – भारत
नोनकुलेलको मलाबा – दक्षिण अफ्रीका
साराह ग्लेन – इंग्लंड
शकेरा सेलमान – वेस्ट इंडीज
अयाबोंगा खाका – दक्षिण अफ्रीका
लिह ताहुहू – न्यूझीलंड
जहांनारा आलम – बांग्लादेश
मेगन शूट – ऑस्ट्रेलिया
फेरया डेविस – इंग्लंड
शमिला कोनेल – वेस्ट इंडीज
एमी जोन्स – इंग्लंड
बेरनाडिने बेजुडेनहॉट – न्यूझीलंड
सुषमा वर्मा – भारत
अनुष्का संजीवनी- श्रीलंका
तानिया भाटिया – भारत
चमारी अट्टापट्टू – श्रीलंका
डॅनियल वायट – इंग्लंड
सुन लुस – दक्षिण अफ्रिका
जेस जोनेसन - ऑस्ट्रेलिया
प्रत्येक संघाकडे 12 कोटी रुपये -
महिला प्रीमियर लीग लिलावामधील सर्व फ्रँचायझींच्या पर्समध्ये जास्तीत जास्त 12 कोटी रुपये उपलब्ध आहेत. प्रत्येक फ्रँचायझीला किमान 9 कोटी रुपये खर्च करावे लागतील. या रकमेत संघाला किमान 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करावे लागतील. प्रत्येक फ्रँचायझी त्यांच्या संघात जास्तीत जास्त 6 परदेशी खेळाडूंचा समावेश करू शकते. या लिलावात एकूण 409 खेळाडू सहभागी होत असून त्यात 246 भारतीय आणि 163 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात 163 परदेशी खेळाडूंपैकी 8 सहयोगी देशांचे खेळाडूही सहभागी होणार आहेत.