एक्स्प्लोर

WPL 2023 : तगड्या मुंबई संघाला मात दिल्यावर युपीची लढत गुजरातशी, कधी कुठे पाहाल सामना?

UPW-W vs GG-W, Match Preview : एकही सामना न गमावलेल्या मुंबई इंडियन्स संघाला मात दिल्यावर आता युपीचा संघ गुजरात संघाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

WPL 2023 :  महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत एकापेक्षा एक रंगतदार सामने पार पडत आहेत. दरम्यान आता आगामी सामना हा उद्या (20 मार्च) होणार असून हंगामातील हा 17 वा सामना खेळवला जाईल. हा सामना युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स (UP vs GG) या संघांमध्ये होणार आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरीमुळे चर्चेत असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला मात दिल्यामुळे यूपी संघाची चर्चा होत असून आता ते गुजरातविरुद्ध मैदानात उतरली. यूपी संघाने सहापैकी तीन सामन्यात विजय मिळवला असून तीन सामने गमावले आहेत. तर गुजरातने सात पैकी केवळ दोन सामना जिंकले असून 5 सामने गमावले आहेत. तर या सामन्याचं थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता ते पाहूया...

सामना कधी होणार?

युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्या महिला संघांमध्ये उद्या म्हणजेच 20 मार्च रोजी सामना होणार आहे.

सामना कुठे होणार?

युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्या महिला संघांमध्ये सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

सामना किती वाजता सुरू होईल?

युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 3 वाजता टॉस होईल.

सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?

युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.

कसे असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग 11?

गुजरात जायंट्सचा संभाव्य संघ : सब्भिनेनी मेघना, लॉरा वोल्वार्ड/सोफिया डंकले, हरलीन देओल, ऍशले गार्डनर, जॉर्जिया वेरेहम/अ‍ॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा (विकेटकीपर), दयालन हेमलता, स्नेह राणा (कर्णधार), किम गर्थ, मानसी जोशी, तनुजा कंवर

युपी वॉरियर्सचा संभाव्य संघ : देविका वैद्य, अॅलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, शबनीम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget