![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
WPL 2023 : आज मुंबई इंडियन्सची लढत दिल्ली कॅपिटल्सशी, कधी कुठे पाहाल सामना?
MI-W vs DC-W, Match Preview : पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवलेले मुंबई इंडयन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये आज सामना रंगणार आहे.
![WPL 2023 : आज मुंबई इंडियन्सची लढत दिल्ली कॅपिटल्सशी, कधी कुठे पाहाल सामना? WPL 2023: MI-W vs DC-W match preview match predictions when and where to watch WPL 2023 : आज मुंबई इंडियन्सची लढत दिल्ली कॅपिटल्सशी, कधी कुठे पाहाल सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/04/9e5ccd99e683f1c31f4e5d07a773ed7b1677899021307127_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत आज (9 मार्च) हंगामातील सातवा सामना खेळवला जाईल. हा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) या संघांमध्ये होणार आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात मुंबई इंडियन्सने आपले दोन्ही सामने आतापर्यंत जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात गुजरातला 143 धावांनी मात दिल्यावर दुसऱ्या सामन्यात आरसीबीला 9 विकेट्सनी मात दिली. दुसरीकडे दिल्ली संघाने पहिल्या सामन्यात आरसीबीला 60 धावांनी पराभूत करत दुसऱ्या सामन्यात युपी संघाला 42 धावांनी पछाडलं आहे. आता दोघेही गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. दोघांनी दोन-दोन सामने जिंकले असले तरी मुंबईचा नेटरनरेट +5.185 तर आरसीबीचा नेटरनरेट +2.550 इतका असल्याने मुंबई एक नंबरला तर बंगळुरु विजयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही संघ आज आपली विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असेल, कारण दोन्ही संघानी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नसल्यामुळे दोघेही चांगल्या स्थितीत गुणतालिकेत आहेत. पण आजच्या निकालानंतर एका कोण्यातरी संघाच्या नावापुढे पराभव लागणार आहे. तसंच दोन्ही संघामध्ये दमदार खेळाडूंचा भरणा असून मुंबईची मदार कर्णधार हरमनप्रीतवर तर दिल्लीची मदार नुकताच टी20 विश्वचषक जिंकलेल्या मेग लँनिंगवर आहे. तर अशा या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता ते पाहूया...
सामना कधी होणार?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या महिला संघांमध्ये आज म्हणजेच 9 मार्च रोजी सामना होणार आहे.
सामना कुठे होणार?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या महिला संघांमध्ये सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल.
सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)