WTC Points Table : लॉर्ड्सवरील पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का! WTC टेबलचा गेमच फिरला, इंग्लंडनं मारली मोठी झेप
'क्रिकेटचा मक्का' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघ 22 धावांनी सामना गमावला.

World Test Championship 2025-27 Points Table Update : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या गुणतालिकेत भारताला मोठा धक्का बसला आहे. 'क्रिकेटचा मक्का' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघ 22 धावांनी सामना गमावला. या पराभवानंतर इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथी कसोटी 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळली जाणार आहे.
A gripping final session awaits at Lord's 🥶#WTC27 | #ENGvIND ➡️ https://t.co/0NCkPJe9tS pic.twitter.com/sKtrKv4roR
— ICC (@ICC) July 14, 2025
पाचव्या आणि शेवटच्या दिवशी चहापानानंतर जगातील नंबर-1 अष्टपैलू जडेजा आपले अर्धशतक पूर्ण करून क्रिजवर होता आणि त्यावेळी भारताचा स्कोअर 9 बाद 163 होता आणि आता त्यांना जिंकण्यासाठी फक्त 30 धावा करायच्या होत्या. पण चहापानानंतर, भारतीय संघ 170 धावांवर घसरला आणि इंग्लंडने 22 धावांनी सामना जिंकला. जडेजा शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 181 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारला.
टीम इंडियाला आणखी एक धक्का!
लॉर्ड्सवरील पराभवानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया आता चौथ्या स्थानावर घसरली आहे. त्याच वेळी, विजयानंतर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंड आणि श्रीलंका गुणांच्या टक्केवारीत समान आहेत. आतापर्यंत 2025-27 च्या डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी या चक्रात अद्याप एकही सामना खेळलेला नाही आणि म्हणूनच ते क्रमवारीत नाहीत.
WTC टेबलचा गेमच फिरला
डब्ल्यूटीसी 2025-27 च्या पॉइंट्स टेबलमध्ये भारताला तीन सामन्यांमध्ये फक्त एक विजय मिळाला आहे. त्यांच्या खात्यात 12 गुण आहेत आणि त्यांची पॉइंट्स टक्केवारी 33.33 आहे. त्याच वेळी, इंग्लंडकडे तीन सामन्यांमध्ये दोन विजयांसह 24 गुण आहेत आणि त्यांची पॉइंट्स टक्केवारी 66.67 झाली आहे.
ऑस्ट्रेलिया सध्या अव्वल स्थानावर आहे, ज्याने दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यांच्या खात्यात 24 गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी 100 आहे. श्रीलंका 16 गुणांसह आणि 66.67 गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
A #WTC27 statement by Australia's bowlers 👀
— ICC (@ICC) July 14, 2025
Mitchell Starc and Scott Boland keeping cricket historians on their toes in a storming performance 👇#WIvAUShttps://t.co/Gvv36lMTKo
हे ही वाचा -





















