Points Table : आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप, बांगलादेशचा पराभव झाल्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल
World Cup 2023 Points Table : दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकातील चौथ्या विजयाची नोंद केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे.
World Cup 2023 Points Table : दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकातील चौथ्या विजयाची नोंद केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे. दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यात चार विजय मिळवत आठ गुणांची कमाई केली. चौथ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. या सामन्याआधी दक्षिण आफ्रिका तिसऱ्या तर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर होता. बांगलादेशचा 149 धावांनी दारुण पराभव केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा रनरेटही सुधारला आहे. आफ्रिकेच्या विराट विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झालाय.
आजच्या सामन्यात काय झालं ?
दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा 149 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या मोहिमेत चौथा विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेनं पाचपैकी चार सामने जिंकून आठ गुणांची कमाई केली असून, विश्वचषकाच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईतल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशला विजयासाठी 383 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा अख्खा डाव 47 व्या षटकांत 233 धावांत आटोपला. या सामन्यात क्विन्टॉन डी कॉकनं 174 धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेच्या डावाचा पाया घातला. त्यानं 140 चेंडूंमधली ही खेळी 15 चौकार आणि सात षटकारांनी सजवली. डी कॉकनं एडन मारक्रमच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची, तर हेन्ऱिक क्लासेनच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. मारक्रमनं 69 चेंडूंत 60 धावांची आणि क्लासेननं 49 चेंडूंमध्ये 90 धावांची खेळी उभारली. क्लासेननं 90 धावांच्या खेळीला दोन चौकार आणि आठ षटकारांचा साज चढवला.
टीम इंडिया अव्वल स्थानावर -
न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघाने गुणातलिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. यंदाच्या विश्वचषकात टीम इंडिया आतापर्यंत अजय आहे. भारताने पाच सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. किवी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडने पाच सामन्यात चार विजय मिळवले आहेत.
पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाची स्थिती काय ?
अफगाणिस्तानकडून पाकिस्तानचा लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे. पाकिस्तानन संघ गुणातातिलेत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे, पण पाकिस्तानला पाच सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा रनरेटही मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे. विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल.
ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तानसह ऑस्ट्रेलियाचेही चार गुण झाले आहेत. पण सरस रनरेटमुळे ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान पाचव्या स्थानी आहे.
तळाच्या संघाची स्थिती काय ?
बांगलादेशचा संघ दहाव्या स्थानावर घसरला आहे. याआधी तो सातव्या स्थानी होता. तर अफगाणिस्तानचा संघ सहाव्या स्थानावर पोहचला आहे. अफागणिस्तान संघाने पाच सामन्यात दोन विजय मिळवलेत. नेदरलँडचा संघ सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. श्रीलंका संघ एका विजयासह आठव्या स्थानावर आहे. गतविजेता इंग्लंड संघ नवव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडला चार सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागलाय.