World Cup 2023: आख्खा पाकिस्तान भारताच्या बाजूने उभा, टीम इंडियाच्या विजयासाठी 'देव पाण्यात'!
World Cup 2023: भारतीय संघ उपांत्य फेरीपासून फक्त एक पाऊल दूर आहे. वानखेडेच्या मैदानात टीम इंडियाने आज विजय मिळवल्यास सेमीफायनलचे तिकिट मिळणार आहे.
India vs Sri Lanka World Cup 2023: भारतीय संघ उपांत्य फेरीपासून फक्त एक पाऊल दूर आहे. वानखेडेच्या मैदानात टीम इंडियाने आज विजय मिळवल्यास सेमीफायनलचे तिकिट मिळणार आहे. भारताच्या विजयासाठी पाकिस्तान क्रिकेट चाहतेही आतुर असतील. आज अख्का पाकिस्तान भारतीय संघाला सपोर्ट करताना दिसेल. सोशल मीडियावरही अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी टीम इंडियाच्या विजयासाठी ट्वीट केले आहे. पाकिस्तान संघाला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारतीय संघाला सर्व सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे भारताच्या विजयासाठी पाकिस्तानच्या चाहत्यांचा सपोर्ट असेल. त्यासाठी पाकिस्तानच्या चाहत्यांनी भारताच्या विजयासाठी देव पाण्यात ठेवल्याचे म्हटले जातेय.
वानखेडे स्टेडियमवर आज भारताने श्रीलंकेचा पराभव केला, तर पाकिस्तानचे सेमीफायनलचे आव्हान जिवंत ठारणार आहे. आज भारताविरोधात श्रीलंकेचा पराभव झाल्यास त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे भारताच्या विजयासाठी पाकिस्तानचे देव पाण्यात आहेत. वानखेडेवर आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आहे.
सध्या टीम इंडिया गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितच्या संघाने विश्वचषकातील पहिल्या सहा सामन्यात विजय मिळवला आहे. 12 गुणांसह टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज भारताने विजय मिळवल्यास सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. याचा पाकिस्तानला फायदा होणार आहे. पाकिस्तान संघ गुणतालिकेत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाला सात सामन्यात चार पराभव मिळाले आहेत. तीन विजयासह त्यांचे सहा गुण आहेत. श्रीलंका संघाने आज सामना जिंकला तर ते पाकिस्तानच्या बरोबरीने पोहचतील, त्याशिवाय त्यांनाही सेमीफायनलची संधी असेल. त्यामुळे पाकिस्तनला अफगाणिस्तानसोबत श्रीलंकेसोबतही सेमीफायनलसाठी लढत द्यावी लागेल.
पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता खूप कमी आहे, पण आशा अद्याप शिल्लक आहेत. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी आपल्या उर्वरीत सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्याशिवाय इतर संघाच्या जय-पराभवावर अवलंबून रहावे लागेल. आज भारतीय संघाने विजय मिळवला तर पाकिस्तानला फायदा होणार आहे. बुधवारी दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा पराभव केला, त्यामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा उंचावल्या. न्यूझीलंड 8 गुणांसह आता चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे दहा गुण होतील. पाकिस्तानचे उर्वरित दोन सामने न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरोधात आहेत. न्यूझीलंडला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी विजय अनिवार्य आहे, अशा स्थितीत हा सामना रोमांचक होईल.
आणखी वाचा :