एक्स्प्लोर

IND vs ENG Preview : टीम इंडिया उपांत्य फेरीत जाणार की इंग्लंड खोडा घालणार? लखनौच्या मैदानावर आज लढत

World Cup 2023 Preview : भारताला हरवून विश्वचषकातलं आपलं आव्हान टिकवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. तर रोहित शर्माचा भारतीय संघ इंग्लंडला हरवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा नेटानं प्रयत्न करेल. 

IND vs ENG, World Cup 2023 :  गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला आज होणार आहे.  विश्वचषकातल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची गाठ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी पडणार आहे. या दोन संघांमधला विरोधाभास म्हणजे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. भारतानं आतापर्यंत पाचपैकी पाचही सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला पाचपैकी बांगलादेशविरुद्धचा केवळ एकमेव सामना जिंकता आला आहे. त्यामुळं भारताला हरवून विश्वचषकातलं आपलं आव्हान टिकवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. तर रोहित शर्माचा भारतीय संघ इंग्लंडला हरवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा नेटानं प्रयत्न करेल. 

मायदेशात इंग्लंडविरोधात भारताची कामगिरी England vs India Head-to-Head -

भारताने इंग्लंडविरोधात मायदेशात 51 वनडे सामने खेलले आहे. भारतीय संघाने 33 सामन्यात विजय मिळवलाय तर इंग्लंडने 17 सामन्यात भारताचा पराभव केला आहे. भारतीय संघ मायदेशात इग्लंडपेक्षा वरचढ दिसत आहे. भारताने इंग्लंडविरोधात अखेरचा वनडे सामना पुण्याच्या स्टेडिअमध्ये खेळला होता.  या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला होता. 2021 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची मालिका झाली होती. यामध्ये भारताने 2-1 विजय मिळवला होता. 

वनडेमध्ये कुणाचे पारडे जड -  England vs India Head-to-Head in ODI

वनडे सामन्याचा इतिहास पाहिला तर भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत  106 सामने झाले आहेत. भारतीय संघाने 57 सामन्यात विजय मिळवला आहे तर इंग्लंडने 44 सामन्यात बाजी मारली आहे. तीन सामन्याचा निकाल लागला नाही. दोन सामने बरोबरीत सुटले.

विश्वचषकात इंग्लंड सरस - England vs India Head-to-Head in ODI World Cup

1975 पासून 2019 पर्यंत वनडे विश्वचषकात भारताविरोधात इंग्लंडचे पारडे जड दिसत आहे. दोन्ही संघ विश्वचषकात आतापर्यंत 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये इंग्लंड संघाने चार सामन्यात विजय मिळवला आहे तर भारताला तीन सामन्यात बाजी मारता आली आहे. एक सामना बरोबरीत राहिलाय. 

कधी होणार सामना ? - 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना लखनौच्या इकाना स्टेडिअममध्ये रविवारी 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल. 

रविवारी लखनौमध्ये पावसाची शक्यता नाही -

हवामान खात्याच्या माहितीनुसार, रविवारी लखनौमध्ये तापमान 32 अंशांच्या आसपास असेल. चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पावसाची कोणताही शक्यता नाही. याशिवाय आर्द्रता 40 टक्के राहण्याचा अंदाज आहे. रविवारी लखनऊमध्ये पाऊस पडणार नाही, ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंग्लंड आणि भारताच्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल होणार आहे. भारतीय संघ सध्या 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. 

खेळपट्टी कशी ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना लखनौच्या इकाना स्टेडियमवर होत आहे. इकाना मैदानाची खेळपट्टी फिरकीला पोषक आहे. पण विश्वचषकातील सामन्यात ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांनाही मदत करत असल्याचे दिसतेय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना जुन्याच खेळपट्टीवर होत आहे. त्यामुळे फिरकीला मदत मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 

गुणतालिकेतील दोन्ही संघाची स्थिती काय ?

जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला अतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाही. गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाने पाच सामन्यात फक्त दोन गुणांची कमाई केली आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आहे. भारताने आपल्या पहिल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास अव्वल स्थानावर पुन्हा झेप घेणार आहे. 

हार्दिक पांड्या दोन सामन्याला उपलब्ध नाही - 

भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळं त्याला न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही खेळता येणार नाही.   हार्दिक पंड्याला दुखापतीच्या कारणास्तव न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. पुण्यातल्या भारत-बांगलादेश सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर चेंडू अडवताना त्याचा पाय मुरगळला होता. त्यामुळं हार्दिक पंड्याला सक्तीच्या विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे.  हार्दिक सध्या पंड्या पूर्ण विश्रांती घेऊन, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात सामील होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण या सामन्यासाठीही हार्दिक पांड्या उपलब्ध नाही. हार्दिक पांड्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्याविरोधात खेळणार नाही. तो दक्षिण आफ्रिकाविरोधात पाच नोव्हेंबर रोजीच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, असे वृत्त आहे. 

भारताची संभाव्य प्लेईंग 11  - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव/ईशान किशन, अश्विन/सिराज, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव 

इंग्लंडची संभाव्या प्लेईंग 11 - 

जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), हॅरी ब्रूक, मोईन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वुड 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget