Women's T20 World Cup | भारतीय संघाची विजयी हॅट्रीक; सेमीफायनमध्ये एन्ट्री
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शेफालीनं 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, परंतु अन्य फलंदाजांनी अपयशाचा कित्ता गिरवला. या सामन्यात स्मृती मानधनाचे पुनरागमन झाले. तापामुळे तिला दुसऱ्या लढतीत मुकावे लागले होते.
ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील आपला तिसऱ्या सामनात न्यूझीलंडला 4 धावांनी पराभूत करत सेमीफायनल्समध्ये आपली जागा पक्की केली आहे. भारीय संघाने शेफाली वर्माच्या 46 धावा आणि त्यानंतर फिरकी गोलंदाजांच्या धडाकेबाज कामहिरीच्या जोरावर भारताने हा सामना आपल्या खिशात घातला. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश यांच्यानंतर टीम इंडियानं न्यूझीलंडलाही हार मानण्यास भाग पाडले. भारताने न्यूझीलंडसमोर 20 षटकांमध्ये 134 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने 20 षटकांमध्ये 6 गडी गमावत129 धावा केल्या.
134 धावांचं लक्ष्य समोर ठेवून मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाने फक्त 13 धावांवरच पहिला विकेट गमावला. न्यूझीलंडच्या 34 धावांपर्यंत संघातील महत्त्वाचे फलंदाज माघारी परतले. त्यानंतर मेडी आणि कॅटी यांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागिदारी केली आहे. परंतु, 77 धावांवर आधी मेडी 24 धावा करून बाद झाली आणि त्यानंतर कॅटी 25 धावांवर आउट झाली.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शेफालीनं 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, परंतु अन्य फलंदाजांनी अपयशाचा कित्ता गिरवला. या सामन्यात स्मृती मानधनाचे पुनरागमन झाले. तापामुळे तिला दुसऱ्या लढतीत मुकावे लागले होते. स्मृतीनं चौकार खेचून धावांचे खाते उघडले खरे, परंतु तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ली ताहूहूच्या गोलंदाजीवर ती त्रिफळाचीत झाली. तिने केवळ 11 धावा केल्या. 10व्या षटकात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. अॅमेलिया केरनं पहिल्याच चेंडूवर तानिया भाटीयाला बाद केले. तानिया आणि शेफाली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. तानियानं 23 धावा केल्या. तर स्मृती मानधनाने 11 आणि जोम्मिह रोड्रिगेजने 10 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर मात्र केवळ एका धावेवर माघारी परतली.
संबंधित बातम्या :
भारतीय महिलांची विजयी घोडदौड, शेफाली वर्मा-पूनम यादवची निर्णायक कामगिरी
IND vs AUS, Women's T20 WC | T-20 विश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी