मुंबई : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी महिला टी20 विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. इंग्लंडने वेस्ट इंडिजचा पराभव करत तर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव करत सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली. भारतीय संघ ग्रुप-ए मध्ये टॉपवर असून सेमीफायनल्समध्ये पोहोचली आहे. अशाप्रकारे सेमीफायनल्ससाठी तीन संघांच्या नावाचा फैसला झाला आहे. सोमवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सामन्यामधून जो विजेता संघ असेल तो विश्वचषक प्राप्त करण्यासाठी सेमीफायन्समध्ये जाणारा चौथा संघ असेल.


दक्षिण आफ्रिकाने रविवारी ग्रुप-बीमधील सामन्यात पाकिस्तानचा 17 धावांनी पराभव करत सेमीफायनल्समध्ये एन्ट्री केली. सिडनी शो ग्राउंड स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या संघात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकांत 136 धावा केल्या. यामध्ये लाउरा वूल्वार्डने सर्वाधिक म्हणजेच, 53 धावा केल्या. लाउराने या विश्वचषकामध्ये दुसरं अर्धशतक ठोकलं. याव्यतिरिक्त मेरीजेन कापने 31 आणि मिगनॉन प्रीजने 17 धावा केल्या.


IND vs SL, ICC Women's T20 WC | टीम इंडियाचा सलग चौथा विजय, श्रीलंकेचा सात विकेट्सने धुव्वा


लाउराच्या नाबाद खेळीमध्ये 36 चेंडूंमध्ये आठ चौकारांचा समावेश होता. लाउराने अंतिम ओव्हरमधील आठ चेंडूंमध्ये चार चौकार ठोकत आपल्या संघासाठी उत्तम खेळी खेळली. पाकिस्तानच्या वतीने डियान बेगने दोन विकेट घेतले तर अनाम अमीन, अइमान अनवीर, सैयदा शाह आणि निदा डार यांनी एक-एक विकेट्स घेतले. त्यानंतर खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तावनच्या संघाने 20 षटकांत पाच विकेट गमावत फक्त 119 धावा केल्या. कर्मधार जावेरिया खानने 31 आणि आलिया रियाजने नाबाद 39 धावा केल्या. खानच्या 34 चेंडूंच्या खेळीत चार चौकारांचा समावेश होता. तर रियाजने 32 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एक षटकार लगावला. इराम जावेदने नाबाद 17 धावा केल्या.


दक्षिण आफ्रिकेच्या वतीने नोनकुलुलेको मियाबा, शॅबनीम इस्माइल आणि कर्णधार डेन निकेर्कने एक-एक विकेट घेतला. पाकिस्तानचे दोन फलंदाज माघारी परतले. त्यानंतर, इंग्लंडने आपल्या दमदार कामगिरीने वेस्ट इंडिजला 46 धावांनी पराभूत करत सेमीफायनल्समध्ये एन्ट्री केली. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडच्या नटाली शीवरच्या अर्धशतकी खेळीमुळे 20 षटकांत पाच विकेट्सवर 143 धावा केल्या, 57 धावा करणाऱ्या नटालीने 56 चेंडूंमध्ये सहा चौकार ठोकले.


Women's T20 World Cup | भारतीय संघाची विजयी हॅट्रीक; सेमीफायनमध्ये एन्ट्री


याव्यतिरिक्त, डेनिएली वॉटने 29, कर्णधार हीदर नाइटने 17, एमी एलेन जोंसने नाबाद 23 आणि कॅथरीन ब्रंट ने नाबाद 10 धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या संघाने शाकीरा सेलमान, एफे फ्लेचर, अनीसा मोहम्मद आणि स्टेफाने टेलरने एक-एक विकेट घेतले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजने सोफी एलसेस्टन अवध्या 7 धावांवर तीन विकेट्स घेतले. वेस्ट इंडिजचा संघ 17.1 षटकात अवघ्या 97 धावा करत तंबूत परतला. वेस्ट इंडिजच्या वतीने से ली एन किर्बीने सर्वाधिक 20 धावा केल्या. ब्रिटनी कपूर आणि टेलरने 15-15 धावा जोडल्या. इंग्लंडच्या वतीने सोफी व्यतिरिक्त सारा ग्लेनने दोन विकेट्स घेतले तर मॅडी विलियर्स आणि आन्या श्रुबसोलने प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतले.


ऑस्ट्रेलियातल्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतानं श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतीय महिलांचा हा सलग चौथा विजय ठरला. या सामन्यात राधा यादवनं चार, तर राजेश्वरी गायकवाडनं दोन विकेट्स काढून श्रीलंकेला नऊ बाद 113 धावांत रोखलं. त्यानंतर भारतानं तीन विकेट्स गमावून विजयासाठीचं लक्ष्य पंधराव्या षटकात गाठलं.


श्रीलंकेकडून कर्णधार चमारी अटापटू 33 आणि दिलहारी 25 धावा केल्या. दोघींच्या या खेळीमुळे श्रीलंकेने 20 षटकात टीम इंडियाला 114 धावांचं लक्ष्य दिलं. भारताकडून राधा यादवने 4, राजेश्वरी गायकवाडने 2 आणि दिप्ती शर्मा, शिखा पांडे, पूनम यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्माच्या 47 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाने हे लक्ष्य सहज पार केलं. टीम इंडिया विश्वचषकातील साखळी फेरीतील चारही सामने जिंकत अ गटात टॉपवर आहे. तसेच भारतीय संघाने विश्वचषकाच्या सेमी फायनल्समध्ये एन्ट्री केली आहे.


सबंधित बातम्या : 


Ind vs NZ, 2nd Test Day 3 | न्यूझीलंडचा भारताला क्लीनस्वीप, टीम इंडियाचा 7 विकेट्सनी पराभव


भारतीय महिलांची विजयी घोडदौड, शेफाली वर्मा-पूनम यादवची निर्णायक कामगिरी


IND vs AUS, Women's T20 WC | T-20 विश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी