सिडनी : पूनम यादवच्या चार बळींच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी पराभूत करत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात विजयी सलामी दिलीय. प्रथम फलंदाजी करत भारताने ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे लक्ष्य दिलं होतं. पण, भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाचा अख्खा संघ 115 धावांवर माघारी पाठवला.

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 4 बाद 132 धावा करत ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे आव्हान दिलं होतं. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी खेळी केली. मात्र, पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाच्या फलंदांजांचं काही चाललं नाही. ऑस्ट्रेलियाची विकेटकीपर अ‍ॅलिसा हेली हिने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर, ऑस्ट्रेलियाची फलंदाज अ‍ॅश्ले गार्डनर शेवटपर्यत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिखा पांडेने तिला झेलबाद करत विजयातील अडथळा दूर केला. अ‍ॅश्ले गार्डनरने 36 चेंडूत 34 धावा केल्या. या विजयासह ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताने विजयी सलामी दिली आहे.

Viral : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये, BCCI कडून एरियल व्ह्यू फोटो शेअर

तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना संयमी सुरुवात केली. भारताने चार षटकांमध्ये 41 धावा केल्या होत्या. मात्र, ऑस्ट्रेलियाची फिरकीपटूने स जोनासेनने भारताची सलामी फलंदाज स्मृती मानधना 10 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. तर, शफाली वर्मा फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाली. तिने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला, पण 15 चेंडूत 29 धावा करून ती बाद झाली. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडला शफालीला झेलबाद करण्यात यश आले. भारताकडून सर्वाधिक दीप्ती शर्माने नाबाद 49 धावा काढल्या. भारताकडून पूनमने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. शिखाने 2 तर राजेश्वरीने एक विकेट घेतली. त्याआधी भारताने दीप्ती शर्माच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे आव्हान दिले होते.

Motera Stadium | विश्वातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम अहमदाबादचं 'मोटेरा!' भारत दौऱ्यात ट्रम्पही देणार भेट