Women Asia cup 2022: भारतीय महिला संघाचा मलेशियावर विजय; सामन्यातील 10 मुद्द्यांवर एक नजर
सिल्हेट आऊटर क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet Outer Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारतानं मलेशियाचा 30 धावांनी पराभव केला.
IND W vs MLY W: महिला आशिया चषकात भारतीय महिला संघानं (India Women Cricket Team) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केलीय. सिल्हेट आऊटर क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet Outer Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारतानं मलेशियाचा 30 धावांनी पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय महिला संघानं 20 षटकात चार विकेट्स गमावून मलेशियासमोर 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियानं 5.2 षटकांत 2 गडी गमावून 16 धावा केल्या. यानंतर पावसामुळं सामना होऊ शकला नाही आणि भारतानं डकवर्थ लुईसच्या नियमानुसार हा सामना 30 धावांनी जिंकलाय.
भारत आणि मलेशिया यांच्यातील सामन्याचे 10 महत्वाचे मुद्दे-
- या सामन्यात नाणेफेक जिंकून मलेशिया संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- भारताची सलामीवीर स्मृती मानधना, शेफाली वर्मानं पहिल्या विकेट्ससाठी 116 धावांची भागेदारी करत संघाची चांगली सुरुवात करून दिली.
- मेघनानं सर्वाधिक 69 तर, दिप्ती शर्मानं 46 धावांचं योगदान दिलं. अखरेच्या काही षटकात ऋषा घोषनं 19 चेंडूत 33 धावांची खेळी केली.
- भारतानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून मलेशियासमोर 182 धावांचं लक्ष्य ठेवलं.
- मलेशियाकडून दुराईसिंघम आणि नूर दानिया यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या.
- भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मलेशियाच्या संघाची सुरुवात खराब झाली.
- मलेशियाच्या संघानं पॉवर प्लेमध्ये दोन विकेट्स गमावल्या. कर्णधार दुराईसिंघम (0 धाव) आणि वान जूलिया (1 धाव) स्वस्तात बाद झाले.
- मलेशियाच्या संघ 5.2 षटकात 16 धावांवर असताना पावसानं सुरुवात केली. त्यानंतर सामना थांबवण्यात आला.
-पावसामुळं सामन्याच्या निकाल लागू शकला नाही. ज्यामुळं डेकवर्थ लुईसच्या नियमांतर्गत भारताला विजयी घोषित करण्यात आलं.
- भारताकडून दीप्ती शर्मा आणि राजेश्वर गायकवाड यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
हे देखील वाचा-