Women's T20 World Cup 2023: महिला T20 विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात महिला संघांमध्ये खेळवला गेला. केपटाऊनमध्ये झालेल्या या रोमांचक सामन्यात कांगारू महिला संघानं (IND vs AUS) टीम इंडियाचा 5 धावांनी पराभव केला. उपांत्य फेरीतील पराभवानंतर महिलांच्या टी-20 विश्वचषकातील टीम इंडियाचा प्रवास संपला. सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया खूपच निराश दिसून आली. विशेषतः सामन्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी आणि विश्वचषकात संघाची धुरा सांभाळणारी टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं माध्यमांशी बोलताना पराभव स्विकारला. तसेच, सामन्यात संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचंही हरमनप्रीतनं कौतुक केलं. सामना आमच्या हातात होता. अशा परिस्थितीत आम्ही पराभवाची अपेक्षा केली नव्हती, असंही हरमन म्हणाली. 


शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले : हरमनप्रीत कौर 


सामन्यानंतर प्रेजेंटेशन सेरेमनी दरम्यान, हरमनप्रीत कौर खूपच निराश दिसली. ती म्हणाली, 'यापेक्षा दुर्दैवी वाटू शकत नाही. जेमिमाच्या खेळीमुळे आम्हाला गती मिळाली होती. त्या स्टेजला येऊन सामना हरण्याची आम्हाला अपेक्षाच नव्हती. मी ज्याप्रकारे धावबाद झाले, यापेक्षा दुर्दैवी काही असू शकत नाही. आमच्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं होतं आणि आम्ही सामन्यातील शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले. आम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं होतं. आम्हाला लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, तेव्हा ते आमच्यासाठी चांगलं होतं. आम्ही सुरुवातीला 2 विकेट झटपट गमावल्या पण आम्हाला माहीत होतं की, आमची फलंदाजी मजबूत आहे."


हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली, "आम्ही जेमिमाला श्रेय देतो, ज्यामुळे आम्हाला मोमेंटम मिळाला. काही चांगली कामगिरी पाहून आनंद झाला. आम्ही चांगली खेळी केली. आज क्षेत्ररक्षणात उणिवा होत्या. आम्ही काही सोप्या कॅचेस सोडल्या."




कालच्या सामन्यानत सेमीफायनल्समध्ये 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियानं पहिले तीन विकेट 3.4 षटकांत 28 धावांत गमावले होते. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 34 चेंडूत 52 धावा आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 24 चेंडूत 43 धावा करत संघाला सांभाळलं. मात्र त्यांच्या खेळीचा फारसा फायदा झाला नाही.


टीम इंडियानं 14.3 षटकांत 4 गडी गमावून 133 धावा केल्या होत्या. हरमन आणि ऋचा घोष क्रीजवर होत्या, त्यामुळे टीम इंडिया सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण इथूनच ऑस्ट्रेलियानं आपल्या विजयाची कहाणी लिहिली आणि पुढच्या केवळ 5 षटकांत टीम इंडियाच्या 4 विकेट्स काढल्या आणि संपूर्ण सामनाच फिरवला.


टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील प्रवास


ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा प्रवास खरंच खूप अविस्मरणीय होता. गट सामन्यांमध्ये भारतीय संघानं चांगली कामगिरी करत 4 पैकी 3 सामने जिंकले. यादरम्यान भारताला केवळ इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. टीम इंडियानं वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आयर्लंडच्या महिला संघांचा पराभव केला. तसेच, भारताला गट सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Harmanpreet Kaur Run-Out: सेमीफायनल्समध्ये रनआऊट झाली हरमनप्रीत, पण चाहत्यांना आठवला धोनी; कनेक्शन काय?