Harmanpreet Kaur Run-Out, Mahendra Singh Dhoni: महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर वर्ल्डकप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं आहे. ऑस्ट्रेलियानं हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचा (Team India) अवघ्या 5 धावांनी पराभव केला. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं या सामन्यात शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीतनं 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली. यादरम्यान तिनं 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. हरमनप्रीत 52 धावांवर रनआउट झाली अन् क्रिडाचाहत्यांची निराशा झाली. पण हरमनप्रीत कौर जशी रनआऊट झाली, ते पाहुन चाहत्यांना टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल धोनीची (Mahendra Singh Dhoni) आठवण झाली. 


2019 चा वर्ल्डकप अन् एमएस धोनी 


हरमनप्रीत कौर रनआऊट झाल्यानंतर चाहत्यांना सोशल मीडियावर माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली. 2019 मधील एकदिवसीय वर्ल्डकपच्या सेमीफायनल्समध्ये कॅप्टन कूल जसा रनआऊट झाला होता, तशीच रनआऊट टीम इंडियाची स्टार फलंदाज हरमनप्रीत कौर झाली होती. 


त्यादिवशी मैदानात काय घडलं होतं? 


2019 एकदिवसीय वर्ल्डकपचा तो दिवस. मैदानात वर्ल्डकप सेमीफायनल्सचा सामना सुरू होता. सामना ऐन रंगात. टीम इंडिया विजयच्या अत्यंत जवळ होती. अन् महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कॅप्टन कूल धोनी क्रिजवर होता. टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूत 33 धावांची गरज होती. चाहत्यांचं लक्ष फक्त आणि फक्त धोनीकडेच होतं. पण कदाचित काळालाच टीम इंडियाचा विजय मान्य नव्हता. पुढच्याच चेंडूवर धोनीन शॉर्ट लगावला आणि रन काढताना आऊट झाला. मग काय, सामना फिरला. हातातला सामना टीम इंडियानं गमावला. 






...म्हणून हरमनप्रीत रनआऊट होताच चाहत्यांना आठवला धोनी 


कालच्या सामन्याची परिस्थिही काहीशी 2019 मधील सामन्यासारखीच होती. हरमनप्रीत कौर खेळत असताना सामना आपल्या हातात आहे, असंच वाटत होतं. हरमनप्रीतनं 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली. हरमन खेळत असताना टीम इंडियाला विजयाला गवसणी घालण्यासाठी 36 चेंडूत 45 धावांची गरज होती. मात्र, हरमनप्रीत रनआऊट झाली आणि सामनाच फिरला.   


आता सोशल मीडियावर चाहते महेंद्रसिंह धोनी आणि हरमनप्रीत कौरचे फोटो शेअर करून दोघांची तुलना करत आहेत. खरं तर, चाहत्यांचा असा विश्वास आहे की, एकदिवसीय विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात जसा महेंद्रसिंह धोनीच्या रनआऊटनंतर सामना फिरला, तसाच सामना हरमनप्रीतच्या रनआऊटनंतर फिरला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India vs Australia Womens Semifinal: 5 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स... ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडिया गारद; वर्ल्डकपचं स्वप्न भंगलं