Women's World Cup 2022: मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ आज विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील तिसरा सामना धोकादायक वेस्ट इंडिजशी खेळत आहे. हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्कवर (Seddon Park) हा सामना सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं होतं. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात भारतानं निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात भारताला 62 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या पराभवानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पवोर (Ramesh Powar) यांनी नाराजी व्यक्त केलीय. तसेच संघातील अनुभवी खेळाडूंनी जबाबदारीनं खेळण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. 


विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारतानं विजयी सलामी दिली. परंतु, दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला पराभूत केलं. या सामन्यात हरमनप्रीत कौर वगळता भारताच्या अन्य फलंदाज मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरले. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारतानं 162 निर्धाव चेंडू खेळले. यावर रमेश पवोर म्हणाले की, "मिताली राज, स्मृती मांधना आणि झूलन गोस्वामी यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी जबाबदारीनं खेळून सामना जिंकून देण्याची गरज आहे. ज्यामुळं युवा खेळाडूंवर दबाव येणार नाही. हा विश्वचषकाचा दबाव आहे. परंतु, चांगली कामगिरी करून दाखवण्याची हिच योग्य वेळ आहे."


संघ-


भारताचा संघ-
यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, मेघना सिंह, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, तानिया भाटिया, रेणुका सिंग, शफा वर्मा सिंह.


वेस्ट इंडीजचा संघ-
डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज, किसिया नाइट, स्टॅफनी टेलर (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेले (विकेटकिपर), चेडियन नेशन, चिनेल हेन्री, आलिया अॅलीने, शमिलिया कोनेल, अनीसा मोहम्मद, शकेरा सेलमनबेंचअफी फ्लेचर, करिश्मा रामहारक, रशादा विल्यम्स, राशदा फ्रेचर


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha