IND vs PAK : आयसीसी महिला विश्वचषकाच्या (ICC Womens world cup 2022) पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानला (India vs Pakistan) मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला. दरम्यान आता भारतीय महिला तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाल्या आहेत. वेस्ट इंडीजविरुद्ध (India vs West Indies) भारतीय महिला आज अर्थात 12 मार्च रोजी मैदानात उतरतील. एक विजय आणि एका पराभवानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ वेस्ट इंडीजचा पराभव करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


कुठे खेळवला जाणार सामना?


भारत विरुद्ध वेस्ट इंडीज महिला संघातील हा सामना न्यूझीलंडच्या सेडन पार्क हॅमिल्टन मैदानात खेळवला जाणार आहे.


कधी खेळवला जाणार सामना?


भारत आणि वेस्ट इंडीज महिला संघातील हा सामना आज अर्थात 12 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, हा सामना सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.


कसा पाहाल सामना?


हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनेलवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार या अॅपवरही हा सामना पाहता येईल.


भारतीय संघ:


मिथाली राज (कर्णधार), तानिया भाटीया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, मेघना सिंह, पुजा वस्त्रकर, रेणुका सिंह, शेफाली वर्मा, रिचा घोष, यस्तीका भाटीया.


हे देखील वाचा-



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live