IPL 2022 Delhi Capitals : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. 26 मार्च पासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. पण त्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज डेविड वॉर्नर सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीचा फटका दिल्ली कॅपिटल्सला बसण्याची शक्यता होणार आहे.
ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ यंदा मैदानात उतरणार आहे. मेगा लिलावात डेविड वॉर्नरला दिल्ली संघाने सहा कोटी 25 लाख रुपये मोजले होते. पण डेविड वॉर्नर आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या 30 मार्च रोजी होणाऱ्या श्रद्धांजली सभेला डेविड वॉर्नर उपस्थित राहणार आहे. त्यानंतर वॉर्नर आयपीएलसाठी भारताकडे रवाना होणार आहे. वॉर्नर भारतात परतल्यानंतर कोरोनाच्या नियमांनुसार, विलगीकरणात राहणार आहे. आयपीएल स्पर्धा 26 मार्च रोजी सुरुवात होणार आहेत. त्यामुळे डेविड वॉर्नर आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे.
डेविड वार्नर म्हणाला की, ‘IPL होईल किंवा नाही, पण मी शेन वॉर्न यांच्या श्रद्धांजली सभेला नक्की जाणार आहे. मी लहान असताना शेन वॉर्नचा फोटो घराच्या भिंतीवर लावला होता. वॉर्न माझा आयडॉल होता. मला वॉर्नप्रमाणे व्हायचे होते. 25 मार्च रोजी पाकिस्तानविरोधातील कसोटी सामना संपल्यानंतर थेट मेलबर्नला पोहचणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सर्व ऑस्ट्रेलियान खेळाडूंना पाच एप्रिलनंतरच आयपीएलमध्ये जाण्याची परवानगी दिली आहे. ‘ दरम्यान, बीसीसीआयच्या नियमांनुसार भारतात आलेल्या सर्व विदेशी खेळाडूंना कोरोना नियमांप्रमाणे पाच दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतर कोरोना चाचणी नकारात्मक आल्यानंतर ड्रेसिंग रुमध्ये जाता येणा आहे.
असा आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
शिलेदार – रिषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी), पृथ्वी शॉ (७.५ कोटी), एनरिच नॉकिया (६.५ कोटी), डेव्हिड वॉर्नर (६.२५ कोटी), मिचेल मार्श (६.५ कोटी), शार्दूल ठाकूर (१०.७५ कोटी), मुस्ताफिजूर रेहमान (२ कोटी), कुलदीप यादव (२ कोटी), अश्विन हेब्बर (२० लाख), सरफराझ खान (२० लाख), कमलेश नागरकोटी (१.१० कोटी), केएस भरत (२ कोटी), मनदीपसिंग (१.१० कोटी), खलिल अहमद (५.२५ कोटी), चेतन साकरिया (४.२० कोटी), ललित यादव (६५ लाख), रिपल पटेल (२० लाख), यश धुल (५० लाख), रोवमन पॉवेल (२.८० कोटी), प्रवीण दुबे (५० लाख)