Women's T20I Tri-Series in South Africa 2023 : भारतीय महिला संघाला (Womens Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) नुकत्याच झालेल्या टी20 सामन्यात 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे हा सामना भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात खेळवल्या गेलेल्या T20 त्रिकोणी मालिकेतील फायनलचा सामना होता. त्यात भारत पराभूत झाल्यामुळे मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. सामन्यात आधी फलंदाजी करत भारतानं हरलीन देवोलच्या (Harleen Deol) 46 धावांच्या मदतीनं 110 धावाचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं. जे त्यांनी 18 षटकांत 5 विकेट्स गमावत पूर्ण केलं आणि सामन्यासह सिरीजही जिंकली.
भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 त्रिकोणी मालिका खेळवली गेली. यामध्ये टीम इंडियाने (Team India) सुरुवातीपासून दमदारल कामगिरी करत फायनलपर्यंत धडक घेतली. पण फायनलच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत खास चमक दाखवता न आल्याने भारत पराभूत झाला. सर्वात आधी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच अनुभवी सलामीवीर स्मृती मंधाना शून्य जेमिमा 11 धावा करुन बाद झाली. हरलीन आणि हरमनप्रीतनं मात्र चांगली भागिदारी करत डाव सावरला. कर्णधार हरमनप्रीत 21 धावा करु शकली, तर हरलीननं 46 धावांचं योगदान दिलं. दीप्ती शर्माच्या नाबाद 16 आणि पुजा वस्त्रकरने नाबाद एक धाव करत भारताची धावसंख्या 109 पर्यंत नेली.
ज्यानंतर 110 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेला (IND vs SA) सुरुवातीपासून खास कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी अधिक धावा दिल्या नाहीत तसंच विकेट्सही घेतल्या. पण दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी संयमी खेळी करत 18 ओव्हरमध्ये 113 धावा करत 5 विकेट्स गमावून सामना जिंकला. यावेळी क्लोई ट्रायॉनने 32 चेंडूत नाबाद 57 धावांची तुफान खेळी केली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा विजय सोपा झाला. विशेष म्हणजे भारताने या मालिकेत सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली होती. त्यांनी सलामीच्या सामन्यातच दक्षिण आफ्रिकेचा 27 धावांनी पराभव केला होता. पण फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत सामना आणि मालिका जिंकली.
हे देखील वाचा-