Women's T20I Tri-Series in South Africa 2023 : भारताच्या अंडर 19 महिला संघाने (U19 Team india) विश्वचषक जिंकल्यावर आता वरिष्ठ महिला क्रिकेटसंघही एक महत्त्वाची मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 त्रिकोणी मालिका खेळवली जात आहे. यामध्ये टीम इंडियाने फायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.




 


टीम इंडियाने स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा अशा स्टार्स खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं आहे. त्यांच्यासोबतच संघातील अधिक अनुभवी खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत. या मालिकेत भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यापूर्वी भारताने एकदा दक्षिण आफ्रिकेचा पराभव देखील केला आहे. तिरंगी मालिकेत टीम इंडियाने पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. यामध्ये भारताने 27 धावांनी दणदणीत विजय नोंदवला होता.  दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचे झाले तर भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर त्याने शानदार पुनरागमन केले. संघाने वेस्ट इंडिजचा 44 धावांनी पराभव केला. यानंतर पुढच्या सामन्यातही 10 गडी राखून विजय मिळवला. 


दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन -


भारत : स्मृती मानधना, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड, स्नेह राणा


दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड, तझमिन ब्रिट्स, लारा गुडॉल, स्युने लुस (कर्णधार), क्लो ट्रायॉन, अॅनेरी डेर्कसेन, नदिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), शबनिम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा


भारताचा दमदार फॉर्म


या त्रिकोणी मालिकेतील भारताचा प्रवास अगदी वाखाणण्याजोगा होता. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 27 धावांनी पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 56 धावांनी पराभव झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना निकालाविना राहिला. त्याचवेळी, यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा आज पुन्हा पराभव केला. आज म्हणजेच 2 फेब्रुवारीला अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत सामना खेळत आहे.


हे देखील वाचा-