Womens T20 World Cup 2023 : महिला टी-20 विश्वचषक (Womens T20 World Cup 2023) सुरू होण्यास काही दिवस उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊनमध्ये 10 फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. या दिवशी यजमान संघ दक्षिण आफ्रिका श्रीलंकेच्या संघाशी भिडणार आहे. 17 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जातील. 26 फेब्रुवारीला विजेतेपदाचा निर्णय होईल.


या विश्वचषकात 10 संघ सहभागी होत असून, त्यांना दोन गटात ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गटातील एक संघ त्यांच्या गटातील इतर चार संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. दोन्ही गटातील अव्वल 2-2 संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील. 10 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान गट टप्प्यातील सामने खेळवले जातील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होतील.


गट-अ: ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका
गट-ब: भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज


10 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका (केपटाऊन, रात्री 10.30)
11 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (पार्ल, संध्याकाळी 6.30 वाजता)
11 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (पार्ल, रात्री 10.30)
12 फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)
12 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (केपटाऊन, रात्री 10.30)
13 फेब्रुवारी: आयर्लंड विरुद्ध इंग्लंड (पार्ल, संध्याकाळी 6.30 वाजता)
13 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड (पार्ल, रात्री 10.30)
14 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (गेकेबेरा, रात्री 10.30)
15 फेब्रुवारी: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (केपटाऊन, संध्याकाळी 6.30 वाजता)
15 फेब्रुवारी: आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, रात्री 10.30)
16 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)
17 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)
17 फेब्रुवारी: आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज (केपटाऊन, रात्री 10.30)
18 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)
18 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गेकेबेरा, रात्री 10.30)
फेब्रुवारी १९: पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज (पार्ल, संध्याकाळी ६.३०)
19 फेब्रुवारी: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (पार्ल, रात्री 10.30)
20 फेब्रुवारी: भारत विरुद्ध आयर्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)
21 फेब्रुवारी: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, संध्याकाळी 6.30 वाजता)
21 फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (केपटाऊन, रात्री 10.30)
23 फेब्रुवारी: उपांत्य फेरी 1 (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)
24 फेब्रुवारी: उपांत्य फेरी 2 (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)
26 फेब्रुवारी: अंतिम (केपटाऊन, संध्याकाळी 6.30 वाजता)


कुठे पाहू शकता सामने?


महिला टी20 विश्वचषकाच्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर होणार असून  हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp  येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.  


हे देखील वाचा