Women's T20 World Cup 2024 Schedule: आयसीसीने महिला टी-20 विश्वचषक 2024 (Women's T20 World Cup 2024) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदाची स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय महिलांचा संघ ग्रुप ए मध्ये असून पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा संघ देखील या ग्रुपमध्ये आहे.
3 ऑक्टोबरपासून आयसीसीने महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. तर भारताचा पहिला सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. 4 ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंडचा संघ एकमेकांसोबत भिडणार आहे.
जगभरातील अनेक चाहते भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याची वाट पाहत असतात. महिला टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा सामना 6 ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर भारत आणि क्वालिफायर-1 यांच्यात सामना होईल. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना 13 ऑक्टोबरला रंगेल. या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना 17 ऑक्टोबर आणि दुसरा उपांत्य फेरीचा सामना 18 ऑक्टोबरला होईल, तर अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने ढाका आणि सिलहटमध्ये 19 दिवसांत होतील. स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. अ गटात पाच संघ आहेत. ब गटातही पाच संघ आहेत. या गटात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि क्वालिफायर 1 चे संघ असतील. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि क्वालिफायर 2 संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
गटवारी-
Group A: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर संघ-1
Group B: दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर संघ-2
पाहा ICC महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक- (ICC Women's T20 World Cup 2024 Full Fixture Schedule)
October 3: England v South Africa, Dhaka
October 3: Bangladesh v Qualifier 2, Dhaka
October 4: Australia v Qualifier 1, Sylhet
October 4: India v New Zealand, Sylhet
October 5: South Africa v West Indies, Dhaka
October 5: Bangladesh v England, Dhaka
October 6: New Zealand v Qualifier 1, Sylhet
October 6: India v Pakistan, Sylhet
October 7: West Indies v Qualifier 2, Dhaka
October 8: Australia v Pakistan, Sylhet
October 9: Bangladesh v West Indies, Dhaka
October 9: India v Qualifier 1, Sylhet
October 10: South Africa v Qualifier 2, Dhaka
October 11: Australia v New Zealand, Sylhet
October 11: Pakistan v Qualifier 1, Sylhet
October 12: England v West Indies, Dhaka
October 12: Bangladesh v South Africa, Dhaka
October 13: Pakistan v New Zealand, Sylhet
October 13: India v Australia, Sylhet
October 14: England v Qualifier 2, Dhaka
October 17: First semi-final, Sylhet
October 18: Second semi-final, Dhaka
October 20: Final, Dhaka
संबंधित बातम्या: