IPL 2024 KKR vs MI: कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 3 मे रोजी सामना झाला. या सामन्यात कोलकाताने 24 धावांनी विजय मिळवला. तर या पराभवानंतर मुंबईचा संघ प्ले ऑफच्या फेरीतून बाहेर पडला आहे.  हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफ खेळण्याचे स्वप्न भंगले. 


कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर माजी महान खेळाडू ग्रॅमी स्मिथ आणि शेन वॉटसन यांनी हार्दिक पांड्यावर टीका केली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या निर्णयावरही त्याने प्रश्न उपस्थित केले. शेन वॉटसनचे मत आहे की कोलकाता नाईट रायडर्स 57 धावांवर 5 विकेट गमावून संघर्ष करत असताना नमन धीरला गोलंदाजी देणे ही मोठी चूक होती.


हा निर्णय हार्दिक पांड्याचा होता की मुंबई इंडियन्सचा डगआउटचा निर्णय?


शेन वॉटसन म्हणाला की नमन धीरला सतत गोलंदाजी करण्याचा हार्दिक पांड्याचा निर्णय असो किंवा मुंबई इंडियन्सच्या डगआउटचा... ही एक मोठी चूक होती. त्यावेळी जसप्रीत बुमराहने फक्त 1 ओव्हर टाकली होती. व्यंकटेश अय्यर आणि मनीष पांडे यांची भागीदारी तोडणे आवश्यक होते, त्यासाठी जसप्रीत बुमराहला गोलंदाजीत आणायला हवे होते, पण हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सच्या थिंक टँकने तसे केले नाही. अशा प्रकारे व्यंकटेश अय्यर आणि मनीष पांडे यांना भागीदारी वाढवण्याची संधी मिळाली.


जेव्हा नमन धीर आणि तिलक वर्मा फलंदाजी करत होते, त्यावेळी...'


त्याचवेळी, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग असलेल्या ग्रॅमी स्मिथने सांगितले की, हार्दिक पांड्या संघर्ष करत आहे यात शंका नाही, ते स्पष्टपणे दबावाखाली दिसत होता. नमन धीर आणि तिलक वर्मा फलंदाजी करत असताना हार्दिक पांड्या फेऱ्या मारत होता, यावरून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर किती दडपण आहे हे स्पष्टपणे दिसून येते. याशिवाय कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या खूपच गोंधळात दिसत होता. त्यामुळे याचा फटका मुंबई इंडियन्सला सहन करावा लागला.


मुंबई इंडियन्सचा पराभव-


केकेआरने पहिल्या खेळात 169 धावा केल्या होत्या, ज्यासाठी व्यंकटेश अय्यरने 70 धावांची शानदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरली तेव्हा संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघाने 46 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. रोहित शर्मा 11 धावा, इशान किशन 13 आणि नमन धीर 11 धावाच करू शकला. सूर्यकुमार यादव खंबीरपणे उभा राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट पडत होत्या. सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 56 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकारही लगावले.  


संबंधित बातम्या:


Rohit Sharma: कोलकाताविरुद्ध रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळला?; टी-20 विश्वचषकाआधी चिंता वाढवणारी बातमी


Hardik Pandya: हार्दिक पांड्या भडकला, भर मैदानात जोरात ओरडायला लागला; बुमराहचा चेहरा पडला, पाहा Video


मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरची चर्चा; वानखेडे मैदानावरील फोटो होतोय व्हायरल