WTC 2022: भारत डब्लूटीसीच्या फायनलमध्ये पोहचणार का? इंग्लंडला पराभूत करणं किती महत्वाचं?
WTC 2022: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतानं आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर सर्वांचं लक्ष इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याकडं लागलंय.
WTC 2022: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतानं आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर सर्वांचं लक्ष इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याकडं लागलंय. भारत गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पुढं ढकलण्यात आला होता. हाच एकमात्र कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ पुन्हा एकदा इंग्लंड दौऱ्यावर गेलाय. या मालिकेत भारतानं 2-1 नं आघाडी घेतलीय. दरम्यान, इंग्लंडमध्ये भारतीय संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. महत्वाचं म्हणजे, बर्मिंगहॅम कसोटी सामना भारताच्या डब्लूटीसीच्या फायनलचा मार्ग ठरवणार आहे.
भारताची विजयी टक्केवारी
भारतानं 2021-23 च्या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळले आहेत. यातील सहा सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. याशिवाय, दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. भारताचे सध्या 77 गुण असून विजयाची टक्केवारी 58. 33 इतकी आहे.
डब्लूटीसीच्या फायनमध्ये पोहचण्यासाठी भारताला काय करावं लागेल?
डब्लूटीसीच्या चॅम्पियनशिपमध्ये भारताला आणखी सात कसोटी सामने खेळायचे आहेत. बर्घिंगमध्ये होणाऱ्या कसोटीचाही यात समावेश आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियावरुद्ध चार कसोटी सामने खेळायचे आहेत. तर, दोन कसोटी सामने बांग्लादेशविरुद्ध खेळले जाणार आहे, जे बांग्लादेशमध्येच होणार आहेत. भारताला हे सर्व सामने जिंकणं गरजेचं आहे. ज्यामुळं भारताची विजयाची टक्केवारी ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक होईल. सात सामन्यापैकी सहा सामने जिंकल्यास भारताची विजयाची टक्केवारी 70 टक्के होईल. दोन कसोटी सामने गमावल्यानंतर भारताची विजयाची टक्केवारी 65 टक्क्यांहून खाली घसरेल. यामुळं भारतीय इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात विजय मिळवण्याच्या हेतूनं मैदानात उतरेल.
डब्लूटीसीचं समीकरण
डब्लूटीसीच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल दोनमध्ये आहे. महत्वाचं म्हणजे, विजयाच्या टक्केवारीच्या आधारवर पहिल्या दोनमध्ये असणाऱ्या संघात फायनल सामना खेळला जातो.
हे देखील वाचा-