Harbhajan's Wife Emotional Post: क्रिकेटविश्वात टर्बिनेटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनं शुक्रवारी (24 डिसेंबर) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची (Harbhajan Singh’s Retirement) घोषणा केली. हरभजन सिंह गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर होता. अखेर काल त्यानं 23 वर्षाच्या कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. हरभजननं संन्यास घेतल्यानंतर त्याची पत्नी गीता बसरा (Geeta Basra) भावूक झालीय. तिनं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट करत हरभजनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


हरभजनच्या निवृत्तीनंतर गीता बसरानं इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये असं लिहलंय की, "मला माहिती आहे, तू या क्षणाची गेले अनेक दिवस वाट पाहिली. हे तू मानसिकदृष्ट्या आधीच ठरवलं होतं. परंतु, शारीरिकदृष्ट्या ही घोषणा फक्त एक औपचारिकता होती. मला आज सांगायचे आहे की, मला तुझा खूप अभिमान आहे. तू तुझ्या करिअरमध्ये खूप काही मिळवलं आहेस. पुढे जात राहण्याचा हा प्रवास सुरूच राहणार आहे. जिथे अनेक गोष्टी तुझी वाट पाहत आहेत. तू खेळत असताना तुझावरचा तणाव आणि चिंतेसह मजा आणि उत्साहदेखील मी पाहिलं आहे." 


गीता बसरा इन्स्टाग्राम पोस्ट- 






 


पाच वर्षांपूर्वी खेळलेला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना
विशेष म्हणजे, हरभजन सिंहनं मार्च 2016 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या टी-20 सामन्यात हरभजननं चार षटकांत एक मेडन षटक टाकून 11 धावा दिल्या होत्या आणि एक विकेट घेतली होती. तसेच त्यानं ऑक्टोबर 2015 मध्ये शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आणि ऑगस्ट 2015 मध्ये शेवटची कसोटी सामना खेळला होता.


1998 मध्ये पदार्पण
हरभजननं 1998 मध्ये भारतासाठी पदार्पण केलं होतं. त्यानं भारतासाठी 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 417, एकदिवसीय सामन्यात 269 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 25 विकेट्स आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha