WI vs BAN: बांगलादेश क्रिकेट संघानं कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा नकोशा विक्रमाची आपल्या नावावर नोंद केलीय. नॉर्थ साउंड, अँटिगा येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशच्या पहिल्या डावात सहा फलंदाज खाते उघडण्यात अपयशी ठरले. या लाजिरवाण्या कामगिरीमुळं शकीब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचा संघ पहिल्या दिवशी केवळ 103 धावांत गारद झाला.


कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सातव्यांदा असं घडलंय की, एका डावात सहा फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. बांग्लादेश हा एकमेक संघ आहे, ज्यांचे तिसऱ्यांदा सहा फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. श्रीलंकाविरुद्ध गेल्या महिन्यात खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यातही बांग्लादेशचे सहा फलंदाज खातं न उघडताचं माघारी परतले. 


शाकिब अल हसनचं अर्धशतक
बांग्लादेशचा कर्णधार शाकिब हल हसनच्या अर्धशतकाच्या जोरावर बांग्लादेशच्या संघाला पहिल्या डावात 100 धावापर्यंत मजल मारता आली. त्यानं या सामन्यातील पहिल्या डावात 51 धावा करत संघासाठी मोठं योगदान दिलं. त्याच्या व्यतिरिक्त सलामीवीर तमीम इक्बाल (29 धावा) आणि लिटन दासनं 12 धावा केल्या. त्यानंतर बांग्लादेशच्या कोणत्याही फलंदाजाला यांनी दुहेरी अंक गाठला. बांग्लादेशचा डाव 32.5 षटकांवर आटोपला.


वेस्ट इंडीजची दमदार सुरुवात
या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत बांग्लादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. या सामन्यात वेस्ट इंडीजकडून डेन सील्स आणि अल्झारी जोसेफनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. केमार रोच आणि काइल मायर्सनं प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळवल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजनं दोन विकेट्स गमावून 95 धावा केल्या होत्या. कर्णधार क्रेग ब्रॅथवेट 42 धावांवर आणि एनक्रुमाह बोनर 12 धावांवर क्रिजवर उभा आहेत.


हे देखील वाचा-