IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी राजकोट येथील हवामानबाबत महत्वाची माहिती समोर आलीय. राजकोटमध्ये शुक्रवारी ढगाळ वातावरण असून संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ज्यामुळं भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात.
भारतासाठी 'करो या मरो'चा सामना
या मालिकेतील पहिले दोन सामन्या गमावल्यानंतर भारतीय संघानं तिसऱ्या सामन्यात विजय मिळवलाय. विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला 48 धावांनी पराभूत करून भारतानं मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलंय. परंतु, भारतीय संघ या मालिकेत अजूनही 1-2 नं पिछाडीवर आहे. भारताला मालिका जिंकण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिकायचे आहेत. राजकोटमध्ये टीम इंडियाचा डंका वाजला, तर मालिकेचा निर्णायक सामना बंगळुरूमध्ये होईल. पण राजकोटचे हवामान टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकतात.
कसं असेल राजकोट येथील हवामान?
फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाव्यतिरिक्त राजकोटचे हवामान भारतासमोर मोठं आव्हान उभं करू शकताच. राजकोटमध्ये नुकताच पाऊस झाला असून शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात पावसामुळं व्यत्यय येण्याची शक्यता आहे. एका हवामान वेबसाईटनुसार, राजकोटमध्ये शुक्रवारी ढगाळ वातावरण असेल आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजकोट येथे 15 ते 25 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे.
भारतीय संघात दोन बदल होण्याची शक्यता
दरम्यान, चौथ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात भारतीय संघात दोन बदल होण्याची शक्यता आहे. क्षर पटेलच्या जागी रवी बिश्नोई किंवा दीपक हुडा यांना स्थान मिळू शकत. तर, या सामन्यात आवेश खानला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी अर्शदीप सिंहला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. या मालिकेत आवेश खानला एकही विकेट्स मिळवता आली नाही.
हे देखील वाचा-