Ireland squad for the T20 series against India : भारताचा संघ दोन टी 20 सामन्याची मालिका खेळण्यासाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 26 जून आणि 28 जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. भारताविरोधात मायदेशात होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी क्रिकेट आयर्लंड संघाची घोषणा केली आहे.  संघाचे नेतृत्व अँड्र्यू बालबर्नी याच्याकडे सोपवण्यात आलेय.  माक्र अडायर, पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू मॅकब्राईन यांचा समावेश करण्यात आलाय. 

भारताविरोधात होणाऱ्या मालिकेसाठी आयर्लंडमध्ये दोन नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. स्टीफन डोहेनी आणि कोनोर ऑल्फर्ट या दोघांचा 14 खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे. डोहेनी फलंदाज तर ऑल्फर्ट वेगवान गोलंदाज आहे.  

भारताविरुद्ध आयर्लंडचा संघ -
अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कॅपर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, जोश लिटिल, अँड्र्यू मॅकब्राईन, बॅरी मॅकार्थी, कॉनर ऑफ्लर्ट, पॉल स्टलिंर्ग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, क्रेग यंग.

आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ - 
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांचे वेळापत्रक