(Source: ECI/ABP News/ABP Majha)
... म्हणून विराट कोहली अगदी सोपे कॅचही सोडतोय; अजय जडेजाकडून विश्लेषण
गेल्या काही सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली बॅक-टू-बॅक अगदी सोपे कॅच सोडताना दिसत आहे. यासंदर्भात भारताचा माजी फलंदाज अजय जडेजाने खुलासा केला आहे.
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सीरीजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने काही अर्धशतकं फटकावली, परंतु, फिल्डिंगमध्ये मात्र विराटने फारसं चांगंलं प्रदर्शन केलं नाही. कोहली जगभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. परंतु, गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने बॅक-टू-बॅक अगदी सोप्या कॅचही सोडल्या आहेत.
रविवारी सिडनीमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मॅथ्यू वेडने टोलावलेला अगदी सोपा असणारा कॅचही पकडू शकला नाही. अशातच विराटच्या कॅच सोडण्याच्या सत्राबाबत अजय जडेजाने खुलासा केला आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज अजय जडेजा एक उत्तम फिल्डर मानला जातो. जडेजाने यावर टिप्पणी करताना कोहलीकडून झालेल्या चुकांचा विश्लेषण केलं आहे.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर जडेजा म्हणाला की, "विराट कोहलीला गेल्या काही वर्षांमध्ये आपण काही असाधारण कॅच पकडताना पाहिलं आहे." जडेजाने पुढे बोलताना सांगितलं की, "जेव्हा त्याच्याकडे विचार करण्याचा वेळ असतो, तेव्हा मला असं वाटतं की, कधी-कधी गोष्टी डाऊनहिल होत आहे. गेल्या सामन्यांमध्ये त्यांच्याकडे पर्याप्त वेळ होती. तसेच कॅच सोडण्याचा आणि फिटनेसचा काहीही संबंध नाही. कदाचित तो केव्हा योग्य वेळेची वाट पाहत असेल की, केव्हा त्याचे हात आपोपाप कॅच पकडतील" असं म्हणट जडेजाने कोहलीवर निशाणाही साधला आहे.
ऑफ बॅलेंस दिसून आला विराट कोहली
जडेजा बोलताना म्हणाला की, "मला असं वाटतं की, आज त्यांच्याकडे वेळ होता. पण ज्यावेळी ते कॅच पकडण्यासाठी गेले त्यावेळ ते ऑफ बॅलेंस होते. जेव्हा तुम्ही कॅच सोडण्यास सुरुवात करता, अगदी सहज सोप्या कॅचही, तेव्हा बॉल तुमच्याकडे येताना तुम्हाला एखाद्या बॉलप्रमाणे दिसू लागते." जडेजा म्हणाला की, कोहलीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे की, त्यांनी लक्ष केंद्रीत करावं अन्यथा अगदी सहज कॅचही खूप अवघड दिसतील."
दरम्यान, कोहलीने रविवारच्या सामन्यात जेव्हा वेडने टोलावलेला बॉल कोहलीकडे गेला तेव्हा त्याने कॅच पकडण्यापूर्वी तीन वेळा बॉल त्याच्या हातून निसटला. त्यानंतर त्याने सांभाळून बॉल केएल राहुलच्या दिशेने फेकला, राहुलने ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू वेडला रन आऊट केलं. जडेजा याच कॅचबाबत बोलत होता.
महत्त्वाच्या बातम्या :