Ind Vs Nz 2nd T20 : 32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी… तरीही कर्णधार सूर्या चिडला, ईशान किशनने नेमकं काय केलं?, मॅच संपल्यावर कारण सांगितलं
Why Suryakumar Yadav was angry at Ishan Kishan : न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरा टी-20 सामना जिंकत भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.

Why Suryakumar Yadav was angry at Ishan Kishan : न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरा टी-20 सामना जिंकत भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 209 धावांचे आव्हान अवघ्या 92 चेंडूत पूर्ण करत दणदणीत विजय मिळवला. या विजयात कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक योगदान दिले. त्याने फक्त 37 चेंडूत 82 धावा केल्या आणि सामना भारताच्या बाजूने झुकला. मात्र ईशान किशनने या विजयाचा खरा पाया रचला. अडचणीच्या क्षणी मैदानात उतरून ईशानने आक्रमक खेळत तुफानी अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, ईशानच्या या झंझावाती खेळीदरम्यान काही क्षण असे आले की सूर्यकुमार यादवला त्याच्यावर रागावला होता. सामन्यानंतर स्वतः सूर्यकुमारने याचा खुलासा करत हा किस्सा सांगितला.
सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
सामन्यानंतर ईशान किशनच्या पुनरागमनावर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादव मनमोकळेपणाने व्यक्त झाला. सूर्यकुमार म्हणाला, “मला माहिती नाही ईशानने दुपारी जेवणात काय खाल्लं होतं किंवा सामन्याआधी काय तयारी केली होती. पण 6 धावांवर दोन विकेट पडल्यानंतर कोणी इतक्या आक्रमक पद्धतीनं खेळताना आणि पॉवरप्ले संपेपर्यंत 67-70 धावा करताना मी कधीच पाहिलं नव्हतं. ते खरोखरच अविश्वसनीय होतं. 200 किंवा 210 धावांचा पाठलाग करताना आम्हाला फलंदाजांकडून एवढंच अपेक्षित असतं, मैदानावर उतरून मोकळेपणाने खेळावं आणि खेळाचा आनंद घ्यावा. आज ईशानने तेच केलं.”
Packing a punch! 👊💪
— BCCI (@BCCI) January 23, 2026
Ishan Kishan is the Player of the Match for his blistering knock of 7⃣6⃣(32), including 1⃣1⃣ fours and 4⃣ sixes 👌
Scorecard ▶️ https://t.co/8G8p1tq1RC#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @ishankishan51 pic.twitter.com/eTYdv0AfPv
स्ट्राइकच दिली नाही म्हणून नाराज...
सूर्या पुढे हसत म्हणाला की, “पॉवरप्लेमध्ये त्याने मला स्ट्राइकच दिली नाही, त्यामुळे थोडा राग आला होता. पण काही हरकत नाही. मला आठ-दहा चेंडू खेळायला वेळ मिळाला आणि मला माहीत होतं की नंतर संधी मिळाल्यावर मी त्याची भरपाई नक्की करेन.”
'सध्या जे घडतंय त्याचा मनापासून आनंद घेतोय...’
आपल्या फॉर्मबाबत बोलताना भारतीय टी20 संघाचा कर्णधार म्हणाला, “मी याआधीही सांगितलं आहे की नेट्समध्ये मी चांगली फलंदाजी करत होतो. गेल्या दोन-तीन आठवड्यांत घरी जे काही केलं, त्याचा फायदा झाला. कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवता आला, सराव सत्रही उत्तम झाली आणि सध्या जे काही घडत आहे, त्याचा मी पूर्ण आनंद घेत आहे.”
हे ही वाचा -





















