एक्स्प्लोर

Team India Test squad for England: इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरला कसोटी संघात का घेतलं नाही? अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं

Team India Test squad: इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल असेल तर उपकर्णधार ऋषभ पंत असेल. श्रेयस अय्यरला या संघात स्थान नाही.

Shreyas Iyer Team India: शुभमन गिल याच्याकडे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा देत नव्या भारतीय क्रिकेटमधील नव्या पर्वाला आरंभ करणाऱ्या बीसीसीआयच्या निवड समितीने श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संघातून वगळल्यामुळे सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. गौतम गंभीरच्या आग्रहाने इंग्लंड दौऱ्यासाठीच्या (Ind Vs England Test series) कसोटी संघात अनेक नव्या आणि ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र, अशावेळी भारतीय क्रिकेटमधील आघाडीच्या आणि यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या श्रेयस अय्यरला निवडकर्त्यांनी संधी का दिली नाही, हा एकच प्रश्न सर्वतोमुखी आहे. (Team India Test Squad)

गेल्या काही काळापासून श्रेयस अय्यर याच्याकडे भारतीय संघाचा (Team India) मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून पाहिले जात आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत श्रेयस अय्यरने आपणे नाणे खणखणीतपणे वाजवून दाखवले होते. सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतही श्रेयस अय्यर याने पंजाबच्या संघाचे नेतृत्व करताना चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठीच्या यंग ब्रिगेडमध्ये श्रेयस अय्यरचा समावेश निश्चित मानला जात होता. परंतु, काल भारतीय कसोटी संघ जाहीर झाला तेव्हा त्यामध्ये श्रेयस अय्यरचे नाव नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. याविषयी बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना  पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली. तेव्हा अजित आगरकर यांनी श्रेयस अय्यरसाठी भारतीय कसोटी संघात जागा नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

श्रेयस अय्यर याने एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगली कामगिरी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी चांगली आहे. परंतु, सध्याच्या घडीला भारतीय कसोटी संघात त्याच्यासाठी जागा नाही, असे अजित आगरकर यांनी स्पष्ट केले. श्रेयस अय्यरने जानेवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. श्रेयसने आतापर्यंत 14 कसोटी सामन्यांमध्ये 36.86 च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत. 

India Test squad: श्रेयस अय्यरला भारतीय कसोटी संघात कोणत्या कारणामुळे स्थान मिळाले नाही?

इंग्लंड दौऱ्यासाठीच्या कसोटी संघात करुण नायरला संधी मिळाली आहे. तर शार्दुल ठाकूर यालाही संघात परत घेण्यात आले आहे. तर साई सुदर्शन आणि अर्शदीप सिंग हे इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करतील. विराट कोहली निवृत्त झाल्यामुळे मधल्या फळीत त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर कितपत यशस्वी ठरेल, याबाबत निवड समितीला शंका असल्यामुळे त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला नाही, असे सांगितले जाते.

लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या उणीवा आणि मर्यादा अनेकदा स्पष्ट झाल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी श्रेयस अय्यरने प्रयत्नही केले. कसोटी सामने मायदेशात झाले असते तर श्रेयस अय्यरला कदाचित संघात संधी मिळू शकली असती. श्रेयस अय्यरला लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये खेळताना आपले तंत्र आणखी मजबूत करावे लागेल. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरची कामगिरी अफलातून असली तरी या दोन्ही क्रिकेटमध्ये फरक आहे. याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये परिस्थितीशी जुळवून घेणेही गरजेचे असते. इंग्लंडमध्ये तेथील वातावरणाशी जुळवून लाल चेंडूचा सामना करणे श्रेयस अय्यरला अवघड जाईल. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर चेंडू स्विंग होतो, बरीच मुव्हमेंट मिळते. अशावेळी चेंडू सोडून द्यावे लागतात. या तंत्रात श्रेयस अय्यर अजूनही कमी पडत असल्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याचा विचार झाला नसावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Team India: इंग्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

आणखी वाचा

शुभमन गिल-गौतम गंभीर 'या' 7 खेळाडूंना बसवणार बेंचवर? जाणून घ्या इंग्लंडमध्ये टीम इंडियाची प्लेइंग-11

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget