एक्स्प्लोर

Jasprit Bumrah News : जसप्रीत बुमराह ओव्हल टेस्टमधून टीमला सोडून गेला निघून… बीसीसीआयची घोषणा, काय आहे या निर्णयामागचं कारण?

England vs India 5th Test Update : लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Jasprit Bumrah released from India squad : लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाआधी बीसीसीआयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत टीम इंडियाच्या एक स्टार खेळाडूला स्क्वॉडमधून रिलीज केल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, या खेळाडूचा समावेश ओव्हल कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये झाला नव्हता.

बीसीसीआयचा मोठा निर्णय 

भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कसोटी मालिकेच्या दरम्यानच टीममधून रिलीज करण्यात आले आहे. बीसीसीआयने बुमराहचा वर्कलोड लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. या मालिकेत बुमराहने तीन कसोटी सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करत 14 विकेट घेतले आणि भारतीय गोलंदाजीचा कणा ठरला. मात्र, मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीत त्याच्या वेगात घट झाल्याचे जाणवले, त्यामुळे वैद्यकीय टीमने त्याला विश्रांती देण्याचा सल्ला दिला.

या मालिकेच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट झाले होते की, बुमराह फक्त तीन कसोटी सामने खेळणार आहे. त्याच्या पाठीच्या जुन्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंट कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते. ओव्हल कसोटीत बुमराहच्या जागी आकाश दीपला संधी देण्यात आली आहे, जो नुकताच दुखापतीमधून सावरला आहे.

मालिकेतील बुमराहची कामगिरी

जसप्रीत बुमराहने या मालिकेत लॉर्ड्स, हेडिंग्ले आणि मँचेस्टर कसोटीत खेळला आणि आपल्या अचूक यॉर्कर्स व स्विंगमुळे इंग्लिश फलंदाजांना अक्षरशः हैराण केलं. मँचेस्टर सामन्यात त्याने 33 षटकांत फक्त दोन बळी घेतले, पण त्याची उपस्थिती ही भारतीय गोलंदाजीसाठी खूप महत्त्वाची ठरली. हा सामना अनिर्णित राहिला होता. सध्या भारत 1-2 ने मालिकेत पिछाडीवर आहे आणि ओव्हल कसोटी जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत आणण्याचा संघाचा प्रयत्न आहे.

सामन्याबद्दल बोलयाचे झाले तर, ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव 224 धावांवर संपला. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडिया जास्त षटके खेळू शकली नाही आणि भारताने शेवटचे 4 विकेट अवघ्या 20 धावांत गमावले. भारताकडून अर्धशतक करणारा एकमेव फलंदाज करुण नायर होता, ज्याने 57 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सनने पाच विकेट घेतल्या. अ‍ॅटकिन्सनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही चौथी वेळ आहे.

हे ही वाचा - 

Lionel Messi News : फुटबॉलचा बादशाह क्रिकेटच्या पिचवर, धोनी-विराटसोबत बॅट हातात घेणार लिओनेल मेस्सी! वानखेडेवर रंगणार सामना, जाणून घ्या कधी

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
IND vs SL 1st Test DAY-4 Live : पहिल्याच षटकात जैस्वाल OUT, गिल-पडिक्कलही माघारी; तरी भारताचा पलटवार सुरू, श्रीलंकेवर 294 धावांची आघाडी
पहिल्याच षटकात जैस्वाल OUT, गिल-पडिक्कलही माघारी; तरी भारताचा पलटवार सुरू, श्रीलंकेवर 294 धावांची आघाडी
IND vs SL 1st Test : मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये...! भारत आणि श्रीलंका सामन्यात सीनियर खेळाडूला गंभीर दुखापत, गॉल टेस्टमध्ये अचानक काय घडलं?
मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये...! भारत आणि श्रीलंका सामन्यात सीनियर खेळाडूला गंभीर दुखापत, गॉल टेस्टमध्ये अचानक काय घडलं?
Asian Games 2026 All Team Squad : भारताकडून अय्यर, पाकिस्तानचा फरहान...; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 4 संघांनी जाहीर केला Squad, 6 टीमाचे संघ अजून गुलदस्त्यात
भारताकडून अय्यर, पाकिस्तानचा फरहान...; आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 4 संघांनी जाहीर केला Squad, 6 टीमाचे संघ अजून गुलदस्त्यात

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget