एक्स्प्लोर

आयपीएलमध्ये बाद होणारा पहिला फलंदाज कोण, विकेट कोणत्या गोलंदाजाने घेतली ?

IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. आतापर्यंत आयपीएलचे 16 हंगाम पार पडलेत.

IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. आतापर्यंत आयपीएलचे 16 हंगाम पार पडलेत. पण आयपीएलची पहिली विकेट कुणी घेतली? याबाबत तुम्हाला माहितेय का ? विसरलात ना? हो... कारण 2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली होती. कोलकाता आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगला होता. या सामन्यात आयपीएलमधील पहिलेच शतक ठोकलं गेलं होतं. कोलकात्यानं सलामीचा सामना 140 धावांनी जिंकला होता. पण पहिल्या सामन्यात पहिली विकेट कुणी घेतली? याबद्दल मोजक्याच लोकांना माहिती नसेल. याबाबत जाणून घेऊयात..

आयपीएलची पहिली विकेट कुणी घेतली ? 

आयपीएलला 2008 मध्ये सुरुवात झाली. राहुल द्रविडचा आरसीबी आणि सौरव गांगुलीचा कोलकाता यांच्यात सलामीचा सामना रंगला होता. राहुल द्रविडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याकडून सौरव गांगुली आणि ब्रँडन मॅक्युलम यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही आरसीबीच्या गोलंदाचांचा खरपूस समचार घेतला. दोघांमध्ये 60 धावांची भक्कम भागिदारी झाली. पण सहाव्या षटक घेऊन झहीर खान आला. झहीर खानच्या पहिल्या चेंडूवर मॅक्युलमने एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर सौरव गांगुलीने यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन गेला अन् स्लीपमध्ये उभं असलेल्या जॅक कॅलिसच्या हातात स्थिरावला. आयपीएलच्या इतिहास बाद होणारा पहिला फलंदाज सौरव गांगुली ठरला तर विकेट घेणारा गोलंदाज झहीर खान ठरला. 

आरसीबीचा 82 धावांवर खुर्दा - 

कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 222 धावांचा डोंगर उभारला. कोलकात्याकडून ब्रँडन मॅक्युलम यानं नाबाद 158 धावांची खेळी केली. मॅक्युलमनं आपल्या विस्फोटक खेळीमध्ये 13 गगनचुंबी षटकार लगावले. त्याशिवाय 10 खणखणीत चौकारांचा पाऊसही पाडला. मॅक्युलमचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावांचा पल्ला पार करता आला नाही. गांगुली 10, रिकी पाँटिंग 20, डेविड हसी 12 धावांची खेळी केली.  आरसीबीकडून झहीर खान आणि जॅक कॅलीस यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. कोलकात्यानं दिलेल्या 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची अवस्था दैयनिय झाली. आरसीबीचा संघ फक्त 82 धावांत गारद झाला. आरसीबीकडून एकाही फलंदाजाला 20 धावसंख्याही पार करता आली नाही.. राहुल द्रविड, वासीम जाफर, विराट कोहली, जॅक कॅलिस, कॅमरुन व्हाइट, मार्क बाऊचर यासारखे धुरंधर अपयशी ठरले. आरीसीबीकडून प्रविण कुमार यानं सर्वाधिक 18 धावांची खेळी केली. कोलकात्याकडून अजित आगरकर यानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्याशिवाय अशोक डिंडा, सौरव गांगुली यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Embed widget