Ibrahim Zadran Broke Shubman Gill ODI Record : अफगाणिस्तानने (Afghanistan) श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) पहिल्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह अफगाणिस्तानने (AFG vs SL) मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या युवा खेळाडून भारताच्या शुभमन गिलचा (Shubman Gill) रेकॉर्ड मोडला आहे. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रान याने 98 चेंडूत 98 धावांची शानदार खेळी करत अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला. या खेळीसोबतच त्याने नवा विक्रम रचला आहे. श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना 268 धावांचं लक्ष्य दिलं होतं. आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने इब्राहिमच्या वादळी खेळीच्या जोरावर 19 चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला.


इब्राहिम झद्रानने शुबमन गिलच्या तोडीस तोड


इब्राहिम झाद्रान त्याच्या वनडे कारकिर्दीतील चौथ्या शतकाला फक्त दोन धावांनी मुकला. असं असलं तरी, अवघ्या 21 वर्षीय इब्राहिम झाद्रानने भारताचा युवा स्टार खेळाडू शुभमन गिलचा विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. श्रीलंका विरुद्ध पहिल्या सामन्याच अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रान याने वनडे किक्रेटमधील 500 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. झाद्रान याने नऊ सामन्यांमध्ये ही विक्रमी कामगिरी केली आहे. 


इब्राहिम झद्रानने शुबमन गिलचा विक्रम मोडला


इब्राहिम झद्रानने 98 धावांच्या खेळीच्या जोरावर इब्राहिम झाद्रानने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 धावा पूर्ण केल्या. 21 वर्षीय झाद्रानने अवघ्या नऊ डावात हा पराक्रम केला आहे. भारताचा युवा खेळाडू शुभमन गिल 10 डावात 500 धावांचा टप्पा पार केला होता. आता इब्राहिम झाद्रान शुभमन गिलचा रेकॉर्ड मोडला आहे. 


'या' यादीत दुसऱ्या स्थानावर


एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 500 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इब्राहिम झाद्रान आता संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी हा पराक्रम इंग्लंडचा डेनिस एमिस आणि केविन पीटरसन, नेदरलँडचा टॉम कूपर आणि पाकिस्तानचा इमाम-उल-हक यांनी नऊ डावात 500 धावा पूर्ण केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 500 धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जानेमन मलानच्या नावावर आहे. त्याने केवळ 7 डावात हा विक्रम केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


गिल दा मामला.... शुभमन गिलचे तिसरे शतक, अनेक विक्रमाला घातली गवसणी